विद्यार्थी असावे तर असे! IIT Bombay च्या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेला दिली 57 कोटींची देणगी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 08:04 PM2023-12-24T20:04:17+5:302023-12-24T20:05:28+5:30

IIT Bombay: अलीकडेच IIT बॉम्बेच्या 1998 च्या बॅचचा गेट टू गेदर सोहळा पार पडला. यावेळी ही देणगी देण्यात आली.

Should be like this! Alumni of IIT Bombay donate 57 crores to the institute | विद्यार्थी असावे तर असे! IIT Bombay च्या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेला दिली 57 कोटींची देणगी

विद्यार्थी असावे तर असे! IIT Bombay च्या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेला दिली 57 कोटींची देणगी

IIT Bombay Alumni: एखाद्या व्यक्तीने मोठ्या पदावर पोहोचल्यानंतर आपल्याला शिकवणाऱ्या शाळा किंवा कॉलेजला देणगी दिल्याचे अनेकदा घडले आहे. IIT बॉम्बे(मुंबई) च्या माजी विद्यार्थ्यांनी तर अनेकदा संस्थेला मोठी रक्कम देणगी स्वरुपात दिली आहे. अलीकडेच IIT बॉम्बेचा रौप्य महोत्सवी गेट-टू-गेदर सोहळा थाटामाटात साजरा झाला. या सोहळ्यात IIT बॉम्बेच्या 1998 सालच्या बॅचने संस्थेसाठी तब्बल 55 कोटी रुपयांहून अधिकची देणगी दिली.

या माजी विद्यार्थ्याचे सर्वाधिक योगदान 
आयआयटी बॉम्बेच्या 200 हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजला भरभरुन देणगी दिली. या देणगीदारांमध्ये प्रामुख्याने प्रायव्हेट इक्विटी फर्म सिल्व्हर लेकचे व्यवस्थापकीय संचालक अपूर्व सक्सेना,  पीक XV चे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र सिंह, व्हेक्टर कॅपिटलचे एमडी अनुपम बॅनर्जी, एआय रिसर्चचे दिलीप जॉर्ज, गूगल डीपमाइंड, ग्रेट लर्निंगचे सीईओ मोहन लकहमराजू, कोलोपास्ट एसवीपी मनु वर्मा, सिलिकॉन व्हॅलीतील उद्योजग सुंदर अय्यर, इंडोवेंसचे को-फाउंडर आणि सीईओ संदीप जोशी आणि अमेरिकेतील एचसीएलचे मुख्याधिकारी श्रीकांत शेट्टी यांचा समावेश आहे.

संस्थेने काय म्हटले?
या देणगीबाबत IIT बॉम्बेचे संचालक सुभाषिस चौधरी म्हणाले की, '1998 च्या बॅचने दिलेल्या योगदानामुळे IIT बॉम्बेच्या वाढीला गती मिळेल आणि संस्थेला सर्वोत्तम बनवण्यासाठी हातभार लागेल. तसेच, माजी विद्यार्थ्यांनी उभारलेला निधी IIT बॉम्बेला मोठ्या शैक्षणिक प्रकल्पांना निधी देण्यास सक्षम करेल. आणि यामुळे संशोधनातही वाढ होईल.' विशेष म्हणजे, 1973 च्या बॅचनेही संस्थेसाठी 7.15 कोटींची देणगी दिली आहे. संस्थेच्या अधिकृत X हँडलवरुन ही माहिती देण्यात आली.

Web Title: Should be like this! Alumni of IIT Bombay donate 57 crores to the institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.