सोपान महादू पाटील हे त्यांचे कागदोपत्री नाव असले तरी त्यांची ओळख कष्टक-यांचे ‘भाई’ एस. एम. तात्या अशीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:26 AM2017-10-27T00:26:54+5:302017-10-27T00:26:58+5:30

काही काही माणसं आपलं आयुष्यच अशा पद्धतीने जगतात की, त्यामुळे त्यांचे नाव हे केवळ नाव न राहता ती चक्क चळवळच बनते. त्याच पंक्तीतील नाव म्हणजे भाई एस. एम. तात्या!

Though Sopan Mahadu Patil is his name, he is known as Kapurthala's brother. M. Tatya! | सोपान महादू पाटील हे त्यांचे कागदोपत्री नाव असले तरी त्यांची ओळख कष्टक-यांचे ‘भाई’ एस. एम. तात्या अशीच !

सोपान महादू पाटील हे त्यांचे कागदोपत्री नाव असले तरी त्यांची ओळख कष्टक-यांचे ‘भाई’ एस. एम. तात्या अशीच !

Next

काही काही माणसं आपलं आयुष्यच अशा पद्धतीने जगतात की, त्यामुळे त्यांचे नाव हे केवळ नाव न राहता ती चक्क चळवळच बनते. त्याच पंक्तीतील नाव म्हणजे भाई एस. एम. तात्या! सोपान महादू पाटील हे त्यांचे कागदोपत्री नाव असले तरी त्यांची ओळख मात्र भाई एस. एम. पाटील हीच होती. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याच्या वरवडे या गावात जन्म झालेल्या या माणसाने आपले जीवन अगदी विद्यार्थी दशेपासूनच चळवळीसाठी वाहिले. राष्ट्रप्रेम आणि कष्टकरी बळीराजाविषयी वाटणारी कणव हा त्यांच्या चळवळीचा आणि जीवनाचा खरा आधार होता. त्याच आधाराच्या बळावर सोलापूरची जिल्हा परिषद असो, जिल्हा बँकेचे सभागृह असो अथवा विधिमंडळाचे सभागृह असो त्यांची मुलुखमैदानी तोफ गरजली की, अनेकांचे धाबे दणाणायचे! स्वच्छ चारित्र्य, प्रत्येक आंदोलनाच्या मुळाशी दडलेले लोकहित आणि लढवय्या बाणा यामुळे त्यांच्या तोफेला कमालीची जरब होती. ती जरब त्यांनी अगदी अखेरच्या श्वासापर्यंत जतन केली. त्यांची प्राणज्योत दि. २३ आॅक्टोबर रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी मालवली आणि राज्यभरातील कष्टक-यांच्या आणि बळीराजांच्या चळवळीतून एकच सूर उमटला... अरेऽरे... आपले एस. एम. तात्या आपल्याला सोडून गेले!
स्वातंत्र्यानंतर देशात आणि महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक चळवळींच्या वैचारिक घुसळणीचा काळ सुरू झाला. त्याच काळात कष्टकरी आणि शेतक-यांचा कैवार घेण्याची शपथ घेऊन ३ आॅगस्ट १९४८ रोजी आळंदी येथे केशवराव जेधे, शंकरराव मोरे, क्रांतिसिंह नाना पाटील, माधवराव बागल, तुळशीदास जाधव, पंजाबराव देशमुख, दाजीबा देसाई यांसारख्या देशप्रेमी क्रांतिकारकांनी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. त्यांचीच प्रेरणा घेऊन एस. एम. पाटील या सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील तरुणाने शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा मोठ्या दिमाखात आपल्या खांद्यावर त्यावेळी घेतला. त्या झेंड्याच्या पावित्र्य व प्रतिष्ठेसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचण्याचा निर्णयही त्यांनी त्याच वेळी घेतला. शालेय शिक्षण वरवडे व मोडनिंब या गावी झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी सोलापूर व पुण्याकडे धाव घेतली. शिक्षण आणि चळवळ यांची सांगड घालत पुण्याच्या शिवाजी बोर्डिंगमध्ये राहून त्यांनी कला शाखेची पदवी संपादन केली. राष्टÑ सेवादलातही निष्ठेने कार्य केले. अनेक विद्यार्थी चळवळी चालविल्या. देशात अन्नधान्य तुटवडा असताना १९६५ साली त्यासाठी आंदोलन करणाºया एस. एम. पाटील यांना स्थानबद्धही करण्यात आले होते. गोवा मुक्ती संग्रामात देखील सक्रिय राहिले.
शेतकरी कामगार पक्षावरील निष्ठा जतन करत त्यांनी राज्यात अनेक चळवळी गतिमान केल्या. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात असलेल्या उजनी धरणाचे पाणी माढा तालुक्यालाच मिळत नव्हते. त्यावर २००८ साली त्यांनी रात्री १२ वाजता मशाल मोर्चा काढला आणि शासनाला जागे केले. तो मोर्चा आजही सर्वांना स्मरणात आहे. जिल्हा बँकेत तब्बल चार तप ते संचालक पदावर कार्यरत राहिले. शेतकºयांना अर्थसाह्य मिळविण्यासाठी त्यांची पोटतिडकीने चाललेली धडपड सोलापूर जिल्हा कधीही विसरू शकणार नाही. ‘तात्या’ ही सर्वांनीच त्यांना प्रेमाने दिलेली उपाधी! तात्यांचे चळवळ अधिष्ठान सांभाळण्याची जबाबदारी आता महाराष्टÑात जलतज्ज्ञ म्हणून ख्याती पावलेले जलमित्र अनिल पाटील आणि अ‍ॅड. बाळासाहेब पाटील या तात्यांच्या दोन चिरंजीवांवर आहे. ती त्यांनी समर्थपणे सांभाळावी हीच अपेक्षा.
- राजा माने
१ं्नं.ेंल्ली@’ङ्म‘ें३.ूङ्मे

Web Title: Though Sopan Mahadu Patil is his name, he is known as Kapurthala's brother. M. Tatya!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.