भक्ताचे शंकानिरसन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 05:40 AM2019-05-11T05:40:14+5:302019-05-11T05:40:24+5:30

व्याकूळ परमभक्ताच्या मनात काही शंका निर्माण झाल्या, तर भगवंत स्वत:च शंकांचे निराकरण करतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हा जो व्याकूळ परमभक्त असतो, त्याच्या हातून चूक केवळ अज्ञान दाटून आल्यामुळे घडते...

 Shankanirasana of the devotee | भक्ताचे शंकानिरसन

भक्ताचे शंकानिरसन

Next

- वामनराव देशपांडे

व्याकूळ परमभक्ताच्या मनात काही शंका निर्माण झाल्या, तर भगवंत स्वत:च शंकांचे निराकरण करतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हा जो व्याकूळ परमभक्त असतो, त्याच्या हातून चूक केवळ अज्ञान दाटून आल्यामुळे घडते, ती अशी की तो जेवढे जाणतो, त्याच्या मर्यादित बुद्धीला जेवढे झेपेल तेवढेच सत्य आहे अशी त्याची समजूत होते. याचा अभिमान त्या साधक भक्ताला होतो. तो त्या भक्ताच्या पतनाचा क्षण ठरतो. म्हणून भगवंत स्वत: आपल्या भक्ताचे अज्ञान दूर करतो. भगवंत अर्जुनाला या अज्ञानमयी क्षणांच्या समाप्तीचा मार्ग सांगतात.
तस्मादज्ञानसम्भूतं हत्स्थं ज्ञानासिनात्मन :।
छित्त्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत।।
पार्था, केवळ अज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या आपल्या अंत:करणात घट्ट रुतून बसलेल्या संशयाला, हातात आपण ज्ञानरूपी धारदार तलवार घेऊन त्या अज्ञानाने माखलेल्या संशयाला नष्ट केले पाहिजे, तरच चित्तात समत्व नांदायला सुरुवात होईल. हाच सर्वोत्तम योग अहे. एकदा का चित्त स्थिर झाले, की तू युद्ध करायला सिद्ध होशील. पार्था, कर्मयोगी पुरुषच संशयात्मा नष्ट करू शकतो...
या दृश्य सुंदर विश्वात आपल्याला ही मानवी योनी प्राप्त झालेली आहे. हीच भगवंतांची फार मोठी कृपा झालेली आहे. याची कृतज्ञ जाणीव होणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रथम शारीर भाव विसर्जित करणे अत्यंत आवश्यक आहे. आपण जेव्हा शरीराशी तादात्म्य पावतो, तेव्हाच शरीरांतर्गत षड्रिपू सतत बंड करून उठतात. त्यांचा आपल्या नित्य जगण्यावर तीव्र परिणाम होतो. या षड्रिपूंना नष्ट करण्यासाठी भगवंतांनी एकूण २० साधने सांगितली आहेत. ती सर्वांगात भिनणे निश्चितच आवश्यक आहे.

Web Title:  Shankanirasana of the devotee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.