स्मृती आणि प्रज्ञा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 12:02 AM2018-05-08T00:02:44+5:302018-05-08T00:02:44+5:30

मानवाला अनेक प्रकारच्या शक्ती प्राप्त आहेत. मुख्यत्वे आपण या शक्तींची तीन प्रकारामध्ये विभागणी करू शकतो- शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक. शरीरासंबंधी सगळ्या शक्ती मानवाची भौतिक प्रगती करतात. मानसिक शक्ती ही मानवाला भौतिक प्रगतीबरोबरच तीव्र वैचारिक आणि विवेकशील बनविते. आध्यात्मिक शक्ती अशी शक्ती आहे की जी मानवाला अंतर्मुख करून त्याच्या चेतनेमध्ये परमानंदाचा अनुभव करून देते.

Memory and intelligence | स्मृती आणि प्रज्ञा

स्मृती आणि प्रज्ञा

Next

- डॉ. भूषण कुमार उपाध्याय (भा.पो.से.)

मानवाला अनेक प्रकारच्या शक्ती प्राप्त आहेत. मुख्यत्वे आपण या शक्तींची तीन प्रकारामध्ये विभागणी करू शकतो- शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक. शरीरासंबंधी सगळ्या शक्ती मानवाची भौतिक प्रगती करतात. मानसिक शक्ती ही मानवाला भौतिक प्रगतीबरोबरच तीव्र वैचारिक आणि विवेकशील बनविते. आध्यात्मिक शक्ती अशी शक्ती आहे की जी मानवाला अंतर्मुख करून त्याच्या चेतनेमध्ये परमानंदाचा अनुभव करून देते.
भारतीय विचारवंताच्या मते शारीरिक आणि मानसिक शक्तीच्या मागे जे साधन काम करते, ती आहे स्मृती. ज्या सूचना बाहेरून येतात, त्या सूचना आपल्या मेंदूमध्ये साठून राहतात. या साठलेल्या सूचनांना आपण स्मृती हे नाव दिले आहे. आपल्या शरीर व मनाला या स्मृती संचालित करतात. या स्मृती बाहेरच्या जगातून आलेल्या असल्याने सीमित आणि क्षणिक असतात कारण त्यांचे उत्पत्ती स्थान ‘बाहेरील जग’ हेदेखील सीमित आणि क्षणभंगुर आहे. शेवटी या स्मृतींपासून निर्माण झालेले ज्ञानसुद्धा नेहमी बदलत जाते. जगामध्ये जेवढे विषय आहेत, ते सतत बदलत असतात. आजचा विषय उद्या पूर्णपणे बदलला जातो. प्रत्येक क्षणाला बदलत जाणाऱ्या या जगाकरिता बदलत जाणारे विषय असणे देखील आवश्यक आहे. अन्यथा या जगाचे कालक्र मण चालणे कठीण होईल.
या स्मृतींच्या पलीकडेदेखील मानवामध्ये ज्ञान प्राप्त करण्याची जी शक्ती आहे, ती प्रज्ञेपासून निर्माण होते. प्रज्ञेपासून निर्माण झालेले ज्ञान कधीही बदलत नाही आणि या प्रकारच्या ज्ञानाला सिद्ध करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या प्रमाणाची आवश्यकता राहत नाही. अशा प्रकारचे ज्ञान स्वयंसिद्ध असते. ऋ षी आणि अनेक महान वैज्ञानिकांनी विविध प्रकारच्या प्रज्ञाजन्य ज्ञानाला अविष्कृत केले आहे. श्रीमद्भगवतगीता, कुराण, बायबल, धम्मपद, कल्पसूत्र इत्यादी ग्रंथ हे प्रज्ञाजन्य ज्ञानाची उदाहरणे आहेत. अनेक महान वैज्ञानिकांनी जे मोठ-मोठे शोध लावले, ते कोणत्याही प्रयोगशाळेमध्ये लावले नाहीत. परंतु अचानक त्यांच्या मेंदूमध्ये ती बाब विजेसारखी प्रकटली आणि एका सार्वभौम सिद्धांताचा जन्म झाला. गतीचा सिद्धांत, सापेक्षवादाचा सिद्धांत, आकर्षणाचा सिद्धांत इत्यादी प्रज्ञाजन्य सिद्धांत ही त्याची उदाहरणे आहेत.
प्रज्ञाजन्य ज्ञान हे मनाच्या खोलवरच्या एकाग्रतेतून निर्माण होते. अत्यंत खोलवर एकाग्र मनाची द्वंद्वावस्था पूर्णपणे समाप्त होते आणि निर्मळ जलाप्रमाणे सर्व स्वच्छ दिसू लागते.

Web Title: Memory and intelligence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.