किम उल जोंग यांनी म्हटले ‘सरकलेले’, तर डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले ‘वेडसर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 05:28 AM2017-09-29T05:28:26+5:302017-09-29T05:28:36+5:30

उत्तर कोरियाच्या किम उल जोंग या अध्यक्षाने डोनाल्ड ट्रम्प या अमेरिकेच्या अध्यक्षांना ‘सरकलेले’ (मेंटली डिरेल्ड) म्हटले. तर ट्रम्प यांनी जोंग यांना ‘वेडसरपणा’चे प्रशस्तीपत्र दिले आहे.

Kim Ul Jong said 'slipped', while Donald Trump said 'crazy' | किम उल जोंग यांनी म्हटले ‘सरकलेले’, तर डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले ‘वेडसर’

किम उल जोंग यांनी म्हटले ‘सरकलेले’, तर डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले ‘वेडसर’

Next

उत्तर कोरियाच्या किम उल जोंग या अध्यक्षाने डोनाल्ड ट्रम्प या अमेरिकेच्या अध्यक्षांना ‘सरकलेले’ (मेंटली डिरेल्ड) म्हटले. तर ट्रम्प यांनी जोंग यांना ‘वेडसरपणा’चे प्रशस्तीपत्र दिले आहे. वास्तव हे की हे दोन्ही पुढारी ‘नॉर्मल’ म्हणावे असे नाहीत. त्या दोघांतही एक कमालीचा युद्धखोर एकारलेपणा आहे. एखादी गोष्ट मनात आली की साºयांचे वैर पत्करूनही ती पूर्ण करण्याची जिद्द त्यांच्यात आहे. जोंगला त्याचे आण्विक सामर्थ्य नुसते दाखवायचे नाही तर ते अमेरिकेविरुद्ध वापरून तो देश त्याला बेचिराख करायचा आहे. त्यासाठी आपल्या हॅड्रोजन बॉम्बचा स्फोट तो पॅसिफिक महासागरात करणार आहे. गुआंम हा अमेरिकेचा प्रदेश त्याच्या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात असून त्यावरही अण्वस्त्रे टाकण्याचा संकल्प त्याने बोलून दाखवला आहे. आपला देश भूक आणि दारिद्र्य यांच्या विळख्यात ठेवून त्याने त्याची अण्वस्त्रे विकसित केली आहेत. अमेरिकेला उद्ध्वस्त करण्याची धमकी संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावरून देण्याएवढा तो उद्दाम आहे. तिकडे ट्रम्पही तोडीसतोड म्हणता येईल अशा वृत्तीचे नेते आहेत. ओबामांनी लागू केलेली आरोग्य योजना स्वत:च्या पक्षाचा विरोध पत्करूनही मोडित काढण्याची तयारी त्यांनी केली आहे. पक्ष, विधिमंडळ आणि न्यायालय यांच्याविरोधात जाऊन अमेरिकेतील इस्लाम समाजावर निर्बंध लादण्याचे व त्यांना देशाबाहेर हुसकावून लावण्याचे त्यांचे प्रयत्न जारी आहेत. जनतेचा विरोध पत्करून त्यांनी मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधायला घेतली आहे. हिलरी क्लिंटन यांना तुरुंगात टाकण्याची त्यांची प्रतिज्ञा आहे. शिवाय आपल्या सहकारी मंत्र्यांना आपल्या लहरीनुरूप काढून टाकण्याची त्यांना सवय आहे. इराणवर निर्बंध, मध्यपूर्वेत हस्तक्षेप व रशियावर बहिष्कार अशाही गोष्टी ते करीत आहेत. आजवर असा अध्यक्ष झाला नाही आणि यापुढेही होणार नाही, असे त्या देशातील माध्यमे म्हणू लागली आहेत. निवडणुकीच्या वेळची त्यांची लोकप्रियता घसरून ३८ टक्क्यांवर आली आहे. तात्पर्य, एक छोटा पण अण्वस्त्रधारी आणि दुसरा बलाढ्य अण्वस्त्रधारी अशा दोन पुढाºयांची ही युद्धस्पर्धा आहे. ती त्या देशातील लोकांना नको, ती केवळ या पुढाºयांच्याच डोक्यात आहे. अमेरिकेची ताकद साºया जगाला नमविण्याएवढी मोठी असली तरी त्या देशातील सगळी मोठी शहरे जोंगच्या क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात आली आहेत. ७/११ च्या हल्ल्यात अमेरिकेचीच विमाने वापरून ओसामा बीन लादेनने न्यूयॉकचे टिष्ट्वन टॉवर्स उद्ध्वस्त करून सहा हजार अमेरिकनांची हत्या केली. त्याची भीती आजही तेथील जनतेच्या मनात आहे. शिवाय जोंग हा गृहित धरता न येणारा अविचारी माणूस आहे. त्याची भाषा, वागणे, निर्णय घेणे आणि सतत अण्वस्त्रांच्या सहवासात राहणे हे सारेच त्याच्याविषयीचे एक चमत्कारिक भय वाढविणारे आहे. या अस्त्रांचा वापर तो करणारच नाही, असे कोणी सांगू शकत नाही. अणुयुद्धाचे सारे बळ, त्याचा आरंभ कोण करतो यातच सामावले असते. प्रतिकाराची शस्त्रे उभी होण्याआधीच ते युद्ध सुरू करणारा देश शत्रूचे प्रचंड नुकसान करू शकतो. अमेरिकेला याच गोष्टीची भीती आहे. अणुबॉम्ब वापराल तर सारा उत्तर कोरिया पृथ्वीतलावरून नाहीसा करू असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. मात्र जोंगवर त्याचा परिणाम नाही. तो नुसताच हसत आपली नवी अस्त्रे जगाला दाखवीत आहे. त्याच्या युद्धखोरवृत्तीने जग धास्तावले आहे. जोंग जगाचे ऐकत नाही आणि ट्रम्पही कुणाचा सल्ला मनावर घेत नाहीत. दोन मस्तवाल बैलांची टक्कर व्हावी आणि त्यांच्या खुरांखाली उद्ध्वस्त होणारी शेते पाहणाºयांनी नुसतीच पहावी अशी ही स्थिती आहे. यात ज्या कुणाला शहाणपण येईल तो जगाचा रक्षणकर्ता ठरेल.

Web Title: Kim Ul Jong said 'slipped', while Donald Trump said 'crazy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.