गांधी हत्येचा कट उधळणारे गुरुजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 02:16 AM2017-07-28T02:16:43+5:302017-07-28T02:17:12+5:30

भारताच्या फाळणीच्या रागातून महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली असे म्हटले जाते ते खरे नाही कारण १९४४ मध्ये भिलारे गुरुजी आणि त्यांच्या सहकाºयांनी गांधी हत्येचा कट उधळून लावला होता

gaandhai-hatayaecaa-kata-udhalanaarae-gauraujai | गांधी हत्येचा कट उधळणारे गुरुजी

गांधी हत्येचा कट उधळणारे गुरुजी

Next

भारताच्या फाळणीच्या रागातून महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली असे म्हटले जाते ते खरे नाही कारण १९४४ मध्ये भिलारे गुरुजी आणि त्यांच्या सहकाºयांनी गांधी हत्येचा कट उधळून लावला होता.तेव्हा भारताची फाळणी झालेली नव्हती, की पाकिस्तान निर्मितीला महात्मा गांधी यांनी मान्यता दिली नव्हती.
ंमहाबळेश्वर-पाचगणी या निसर्गसंपन्न डोंगरदºयात वसलेल्या शहरांजवळील भिलारचे भिलारे गुरुजी यांचे नुकतेच देहावसान झाले. लोकसभेच्या १९८९ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वार्तांकनासाठी सातारा जिल्ह्यात फिरत असताना या गांधीवादी कार्यकर्त्याची भेट झाली होती. स्वातंत्र्यासाठी झटणाºया कार्यकर्त्याप्रमाणेच सातारा जिल्हा कॉँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी ते पार पाडत होते. त्यांना सर्वजण भिलारे गुरुजी या नावानेच ओळखत होते. चौकशी केली तेव्हा कळले की, स्वातंत्र्यपूर्व काळात केवळ काही वर्षे शिक्षक असलेले भिकाजी दाजी ऊर्फ भिलारे गुरुजी यांनी महात्मा गांधी यांच्या आवाहनास प्रतिसाद देत नोकरीचा राजीनामा दिला आणि स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले. केवळ सहभागी झाले नाहीत, तर सातारा परिसरातील स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रगण्य स्वातंत्र्यसैनिक म्हणून काम करू लागले.
महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली १९४२ चा चलेजावचा लढा तीव्र झाला होता. त्यात सहभागी होणाºया भिलारे यांना गुरुजी याच नावाने कायम ओळखले जाऊ लागले. १९१९ मध्ये जन्मलेले भिलारे गुरुजी १९४२ पासून अखेरच्या श्वासापर्यंत कॉँग्रेससाठी कार्य करीत राहिले. हे कार्य करताना महात्मा गांधी, सरहद्द गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, यशवंतराव चव्हाण, आदी नेत्यांशी जवळून एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम केले. तरुण गुरुजी सक्रियपणे स्वातंत्र्यलढ्यात काम करीत असताना महात्मा गांधी यांच्याशी परिचय झाला होता. १९४४ मध्ये काही दिवस महात्मा गांधी पाचगणीला आले होते. तेव्हा सर्व कॉँग्रेस कार्यकर्त्यांना भिलारे गुरुजी आणि त्यांच्या सहकाºयांनी एकत्र केले होते. त्या गटास मार्गदर्शन करण्यासाठी महात्मा गांधी आले होते. त्या गर्दीत पुण्याहून आलेल्या तरुणांचा एक गट सामील झाला होता. त्यातील एका तरुणाने महात्मा गांधी सभास्थानाहून बाहेर पडत असताना त्यांच्यावर चाकूने हल्ला केला मात्र त्या तरुणावर झडप टाकत त्याचा चाकूचा हात पकडणाºया कार्यकर्त्यांमध्ये भिलारे गुरुजी होते. त्यांनी त्या तरुणास पकडले, त्याला कार्यकर्त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तो हल्ला करणारा पुण्याचा नथुराम गोडसे होता. महात्मा गांधी यांना हा गोंधळ समजताच त्या तरुणास का मारता अशी चौकशी केली तेव्हा त्यांना आपली हत्या करण्यासाठी पुण्याहून काही तरुण आले होते, असे त्यांना वाचविणाºया भिलारे गुरुजी आणि त्यांच्या सहकाºयांनी सांगितले. तेव्हा त्यांना चर्चेसाठी बोलाविण्याची विनंती महात्मा गांधी यांनी केली; पण ते तरुण पसार झाले. त्यांचा चर्चेवर विश्वास नव्हताच. त्याच तरुणाने (नथुराम गोडसे) महात्मा गांधी यांची ३० जानेवारी १९४८ रोजी नवी दिल्लीत गोळ्या घालून हत्या केली. भिलारे गुरुजी यांच्या निधनाने या सर्व घटनाक्रमांना उजाळा मिळालाच; पण त्याबरोबरच भारताच्या फाळणीच्या रागातून महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली नाही. कारण १९४४ मध्ये भिलारे गुरुजी आणि त्यांच्या सहकाºयांनी गांधी हत्येचा कट उधळून लावला होता. तेव्हा भारताची फाळणी झालेली नव्हती, की पाकिस्तान निर्मितीला महात्मा गांधी यांनी मान्यता दिली नव्हती. महात्मा गांधी यांच्या सर्वधर्म समभाव तत्त्वालाच विरोध करून धर्माधिष्ठित राष्ट्रनिर्मितीच्या उद्देशाने त्यांची हत्या करण्याचा कटच रचला होता. तो पाचगणीत यशस्वी झाला नाही. कारण भिलारे गुरुजी यांच्यासारख्या तरुणांची फळी तेथे उभी होती. स्वातंत्र्यानंतरही भिलारे गुरुजी यांनी त्याच निष्ठेने सातत्याने सहा दशके कॉँग्रेसचे काम केले. गावोगावच्या उन्नतीसाठी ग्राममंडळे स्थापन केली. महाबळेश्वर, पाचगणी, वाई परिसरातील ज्याला जावळीचे खोरे म्हणून ओळखले जाते, त्या खोºयातील दºयाखोºयात पसरलेल्या खेड्या-पाड्यांवर काम केले. आमदार म्हणून निवडूनही आले, गांधी विचारधारेनुसार कार्यच नव्हे, तर जीवनधारा अंगीकारणारे गुरुजी तब्बल ९८ वर्षे जगले. अखेरपर्यंत त्यांनी कॉँग्रेसचा विचार जपला.
- वसंत भोसले

Web Title: gaandhai-hatayaecaa-kata-udhalanaarae-gauraujai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.