समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 12:20 AM2018-04-06T00:20:21+5:302018-04-06T00:20:21+5:30

माझ्या मित्राकडे लग्न समारंभाच्या स्वागत समारंभाला परिवारासहित गेलो होतो. नववधू व वर दोघेही बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून लठ्ठ पगारावर सेवेत होते. समारंभाला पोहचलो तेव्हा प्रवेशद्वाराजवळ एक खूपच मोठे फलक लावले होते ज्यामध्ये वर नववधूला कवेत घेऊन गाणे गात आहे, या आशयाचे चित्र चित्रांकित केले होते.

 The ceremony | समारंभ

समारंभ

Next

- प्रा. डॉ. संदीप ताटेवार

माझ्या मित्राकडे लग्न समारंभाच्या स्वागत समारंभाला परिवारासहित गेलो होतो. नववधू व वर दोघेही बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून लठ्ठ पगारावर सेवेत होते. समारंभाला पोहचलो तेव्हा प्रवेशद्वाराजवळ एक खूपच मोठे फलक लावले होते ज्यामध्ये वर नववधूला कवेत घेऊन गाणे गात आहे, या आशयाचे चित्र चित्रांकित केले होते. मला एका क्षणापुरता चुकून चित्रपटगृहात आल्याचा भास झाला. प्रचंड थंडीचे दिवस असल्यामुळे रात्री ७.३० ला समारंभ आरंभ होणार होता परंतु रात्री ८.३० वाजेपर्यंत नववधू व वर व्यासपीठावर उपस्थित नसल्यामुळे चौकशी केली तेव्हा दोघेही ब्युटी पार्लरमध्ये गेले असल्यामुळे वेळ होत आहे असे कळले नंतर एकदाचे ९.०० वाजता वधू-वर व्यासपीठावर आले. वधूचा पोशाख देहप्रदर्शनासाठी घातल्यासारखा वाटत होता. नववधूच्या गळ्यात मंगळसूत्र नाही हे सासूच्या लक्षात येताच, त्या धावतच व्यासपीठावर गेल्या व छोटूसं तरी मंगळसूत्र फक्त समारंभापुरता घालण्यासाठी वधूची मनधरणी करू लागल्या पण पोशाखाला मंगळसूत्र साजेसं नाही व गळ्यातसुद्धा आरामदायी वाटत नाही म्हणून वधूने सासूची विनंती साफ नाकारली. वयोवृद्ध व इतर नातेवाईक शुभ आशीर्वाद देण्यासाठी व्यासपीठावर जात होते पण वधूवर एखाद्या राजकीय नेत्यासारखे दुरूनच नमस्कार करीत होते. प्रेमानी बोलणे, हसणे व येणाऱ्यांचे स्वागत करणे हा प्रकार कुठेच आढळत नव्हता. आज समाजात पाश्चात्य संस्कृतीचा पगडा सर्वत्र दिसत आहे. शिक्षण व पैशांनी आपण खूप प्रगत झालो व इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आहो हा भाव काही प्रमाणात नवीन पिढीमध्ये वाढत असल्याचे दिसत आहे. आज शिक्षणाने जीवनाची मूल्ये वाढवली की ढासळली? आपण सुशिक्षित तर झालो पण सुसंस्कृत झालो का?
प्रसंगाचे पावित्र्य राखणे, वडिलधा-यांचा मान राखणे, वेळेचे भान ठेवणे हे संस्कार आपल्यात रूजणे व वयानुसार परिपक्व होणे आवश्यक आहे. सहनशक्ती, सहयोग व प्रसंगानुसार तडजोड करण्याची वृत्ती प्रत्येकांनी जोपासणे अभिप्रेत आहेच. या गुणांच्या अभावामुळेच की काय आज घटस्फोट, नैराश्यता, आत्महत्या असे प्रकार नवीन जोडप्यात वाढत आहे. सुखी संसारासाठी एकमेकांबद्दल व इतरांबद्दल प्रचंड आदर, त्याग, जिव्हाळा, तडजोड, सहनशक्ती हे सद्गुण आवश्यक असते हे नवीन पिढीला विसरून चालणार नाही, हे मात्र खरे!

Web Title:  The ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.