शिंदखेडा तालुक्यातील चुडाणे गावात टॅँकरशिवाय पर्यायच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 12:24 PM2018-06-02T12:24:34+5:302018-06-02T12:24:34+5:30

टॅँकरच्या फेºया वाढविण्याची गरज

There is no substitute without tanker in Shudane village of Shindkheda taluka | शिंदखेडा तालुक्यातील चुडाणे गावात टॅँकरशिवाय पर्यायच नाही

शिंदखेडा तालुक्यातील चुडाणे गावात टॅँकरशिवाय पर्यायच नाही

Next
ठळक मुद्देचुडाणे गावात फेब्रुवारी १७ पासून टॅँकरने होतो पाणी पुरवठागावात पाण्याचा स्त्रोतच नाहीपाऊस न झाल्यास, ग्रामस्थांना स्थलांतर करावे लागेल 


आॅनलाइन लोकमत
शिंदखेडा (धुळे) :  तालुक्यातील चुडाणे गावात  कुठेही पाण्याचा स्त्रोत नाही. अमरावती प्रकल्पातही  पाण्याचा साठा नावालाच उरलेला आहे. गावातील विहिरींनीही तळ गाठलेला आहे.गावाची पाणी योजनाही अनेक वर्षांपासून रखडलेली आहे. त्यामुळे उन्हाळ्यातच नव्हे तर पावसाळ्यातही चुडाणे येथील ग्रामस्थांना टॅँकरच्या पाण्यावरच अवबलंनू रहावे लागते.  टॅँकर आला तरच पाणी मिळेल अशी स्थिती आहे. गेल्या चार वर्षांपासून या परिसरात पाऊस नसल्याने ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. अशीच परिस्थिती राहिल्यास संपूर्ण गावालाच स्थलांतर करावे लागेल अशी परिस्थिती आहे.
दोंडाईचापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर चुडाणे गाव आहे.गावाला गेल्या चार वर्षांपासून येथील ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय.
पाणी पुरवठा योजना  रखडली
या परिसरातील गावांचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी २००३ मध्ये चुडाणे, सुराय, कलवाडे या तीन गावांसाठी  ४५ लाखांची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती. त्यासाठी गावापासून ३-४ किलोमीटर अंतरावर असलेल्या अमरावती प्रकल्पात विहिर खोदण्यात आली. तसेच गावात १५ हजार लिटर्सची पाण्याची टाकी बांधण्यात आली. अमरावीत प्रकल्पातील विहीर ते गावाच्या टाकीपर्यंत पाईप लाईनही टाकण्यात आली. मात्र काही कारणास्तव ही योजना बारगळली. त्यामुळे या पाणी पुरवठ्याचे पाणी नागरिकांपर्यंत पोहचलेच नाही.
नवीन योजना मिळत नाही
पूर्वीची योजना रखडल्याने, गावासाठी नवीन योजना मिळत नाही. या गावासाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेमध्ये प्रस्ताव टाकला होता. मात्र तो नामंजूर झाला. पूर्वीची योजना रखडल्याने, नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर होत नसल्याचे सांगण्यात आले.
प्रशासनातर्फे टॅँकर सुरू
ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यसाठी प्रशासनाने या ठिकाणी दोन टॅँकर सुरू केलेले आहेत. हे टॅँकर १० हजार लिटर क्षमतेचे असून, ते मालपूर धरणातून भरले जाते. टॅँकरच्या दोन फेºया होत असतात. परंतु  रात्री-अपरात्री केव्हाही टॅँकर येते. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी जागी रहावे लागते अशी स्थिती आहे. गावात टॅँकरच्या फेºया वाढविण्याची गरज आहे.
गावातील पाणी टंचाई निवारण्यासाठी ग्रामपंचायतीने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार भुजल सर्वेक्षणचे अधिकारीही गावात येऊन गेले. मात्र गाव परिसरात सर्वत्र दगड असल्याने, विहिरींना पाणी लागणार नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. त्यामुळे विहिरींची योजनाही बारगळली. त्यामुळे चुडाणेच्या ग्रामस्थांना पाण्यासाठी टॅँकरवरच अवलंबून रहावे लागते अशी स्थिती निर्माण झालेली आहे.


 

Web Title: There is no substitute without tanker in Shudane village of Shindkheda taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे