मतदानावर बहिष्कार टाकणारा उमेदवार बनला 'खासदार', गावकऱ्यांनी केला सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 01:25 PM2019-04-22T13:25:54+5:302019-04-22T13:27:31+5:30

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले.

boycott candidate Become a member of parliment, voters felicitate villagers in osmanabad lok sabha | मतदानावर बहिष्कार टाकणारा उमेदवार बनला 'खासदार', गावकऱ्यांनी केला सत्कार

मतदानावर बहिष्कार टाकणारा उमेदवार बनला 'खासदार', गावकऱ्यांनी केला सत्कार

googlenewsNext

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील आणि बार्शी तालुक्यातील वाणेवाडी गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. गावात असलेल्या असुविधांबद्दल उमेदवार आणि स्थानिक नेत्यांबद्दल नाराजी दर्शवत अख्ख्या गावाने मतदानावर बहिष्कार टाकला. विशेष म्हणजे या गावातील तरुण मुलगा आणि शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांनीही गावच्या विनंतीला मान देत मतदानावर बहिष्कार टाकला. त्यानंतर, गावकऱ्यांनी चक्क गावचा खासदार म्हणून शंकर यांना घोषित केले, तसेच त्यांचा सत्कार करुन मिरवणूकही काढली. 

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील हे उमेदवार आहेत. तर, शिवसेनेकडून माजी आमदार ओमराजे निंबाळकर हे उमेदवार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असलेल्या बार्शी विधानसभा मतदारसंघाला लोकसभा निवडणुकांसाठी उस्मानाबाद या मतदारसंघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील हक्काचा उमेदवार म्हणून तालुक्यातील वाणेवाडी गावचे पुत्र शंकर गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शेतकरी नेते असलेल्या शंकर गायकवाड यांनी कुणाच्याही दबावाला बळी न पडता उमेदवारी कायम ठेवली. मात्र, गावकऱ्यांच्या विनंतीपूर्वक दबावामुळे चक्क उमेदवार शंकर यांनीही मतदानावर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर, मतदानावर बहिष्कार टाकलेल्या या गावाने एकदिलाने आपला खासदार निवडला. उस्मानाबाद लोकसभेचे अपक्ष उमेदवार आणि गावचे पुत्र शंकर गायकवाड यांनाच आपला खासदार म्हणून गावकऱ्यांनी घोषित केले. त्यानंतर, उमेदवार शंकर गायकवाड यांची गावातून वाजत-गाजत मिरवणूकही काढण्यात आली. खासदारसाहेब तुम आगे बढो... अशा घोषणा देत गावकऱ्यांनी शंकर गायकवाड यांचा सत्कार केला. 

Web Title: boycott candidate Become a member of parliment, voters felicitate villagers in osmanabad lok sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.