लग्नाचा आग्रह धरणाऱ्या तरुणाचा गळा दाबून खून, दोन देवदासींना अटक  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 04:06 PM2019-06-29T16:06:01+5:302019-06-29T16:10:55+5:30

दोघी बुधवार पेठेत अनेक वर्षांपासून राहतात़. मगर हाही मुळचा नेपाळचा राहणार होता़.

youth murdered by throat press due to force marrige, two ladies arrested | लग्नाचा आग्रह धरणाऱ्या तरुणाचा गळा दाबून खून, दोन देवदासींना अटक  

लग्नाचा आग्रह धरणाऱ्या तरुणाचा गळा दाबून खून, दोन देवदासींना अटक  

Next

पुणे : ग्राहक म्हणून येणाऱ्या तरुणाने लग्नाचा आग्रह करुन काम करु देण्यास अडथळा आणत असल्याच्या कारणावरुन बुधवार पेठेतील दोघा देवदासींनी मिळून तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याचा गळा दाबून खुन केला़. बुद्धिश्य मसोई मगर (वय २१) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे़. फरासखाना पोलिसांनी सुनिता गोपाल तमांग (वय २६) आणि उर्मिला जगदिशचंद्र पटेल (वय ५८, दोघे रा़ माचिस बिल्डिंग, बुधवार पेठ) यांना अटक केली आहे़ दोघीही मुळच्या नेपाळमधील राहणाऱ्या आहेत़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, या दोघी बुधवार पेठेत अनेक वर्षांपासून राहतात़. मगर हाही मुळचा नेपाळचा राहणार होता़. तो एका हॉटेलमध्ये काम करत होता़. तो त्यांच्याकडे येत असे़. त्याने सुनिता हिला माझ्याशी लग्न कर, असा तगादा लावला होता़. त्याला अगोदर तिने प्रतिसाद दिला़. तिला एक मुलगी आहे़. मात्र, त्यानंतर त्याला ती विरोध करु लागली़.तेव्हा तो वादावादी करु लागला.तिला काम करु देत नव्हता़.२७ जून रोजी दुपारी बारा वाजता मगर तिच्याकडे आला़. त्यांच्यात वादावादी झाली़. तेव्हा दोघींनी त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली़. त्यानंतर त्याचा गळा दाबला़. त्यात त्याचा मृत्यु झाला़. त्यानंतर त्यांनी शुक्रवार पेठ पोलीस चौकीत एक तरुण बेशुद्ध अवस्थेत पडला असल्याची माहिती दिली़. पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात नेले़. तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले़. शवविच्छेदन अहवालात त्याचा गळा दाबून मृत्यु झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला़. या अहवालावरुन फरासखाना पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन दोघींना अटक केली आहे़. 

Web Title: youth murdered by throat press due to force marrige, two ladies arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.