अरे विश्वास ठेवायचा तरी कोणावर? गस्तीवरच्या पोलिसानेच चोरला झोपलेल्या तरुणाचा मोबाइल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 06:02 AM2022-10-11T06:02:18+5:302022-10-11T06:02:36+5:30

लवकरच होमगार्ड जवानावरही कारवाई केली जाईल. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

Who to believe? A policeman on patrol stole the mobile of a sleeping youth | अरे विश्वास ठेवायचा तरी कोणावर? गस्तीवरच्या पोलिसानेच चोरला झोपलेल्या तरुणाचा मोबाइल

अरे विश्वास ठेवायचा तरी कोणावर? गस्तीवरच्या पोलिसानेच चोरला झोपलेल्या तरुणाचा मोबाइल

googlenewsNext

रात्री स्वतःच्या दुकानाबाहेर झोपलेल्या तरुणाच्या खिशातला मोबाइल चक्क गस्तीवर असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलनेच चोरल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये घडला. पण, ही घटना सीसीटीव्हीत कैद होत असल्याची माहिती त्या पोलिसाला नव्हती.

शनिवारी रात्री महाराजपूर पोलीस स्टेशन अंतर्गत नितीन सिंग नावाचा तरुण स्वतःच्या दुकानाबाहेर वऱ्हांड्यात झोपला होता. त्याचवेळी पोलीस कॉन्स्टेबल प्रगेश सिंग हा एका होमगार्डसोबत गस्तीवर होता. रस्त्यावरून जाताना त्याचे लक्ष अंगावर चादर ओढून झोपलेल्या तरुणाकडे जाते. त्याच्याजवळ जाऊन तो हवालदार चादरीत हात घालून मोबाइल चोरून निघून जातो. रविवारी या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली. नंतर, उच्च पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासानंतर प्रगेश सिंग याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

लवकरच होमगार्ड जवानावरही कारवाई केली जाईल. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, नितीननेही आरोपी हवालदार प्रगेश सिंग आणि होमगार्डविरुद्ध महाराजपूर पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीची तक्रार दाखल केली आहे.  खाकीतले रक्षक जर असे रक्षण करणार असतील तर उत्तर प्रदेशची कायदा-सुव्यवस्था रामभरोसेच आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया या व्हिडिओवर नेटकरी देत आहेत.

Web Title: Who to believe? A policeman on patrol stole the mobile of a sleeping youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस