Washing the head of a textile businessman and killing him | कापड व्यावसायिकाची डोक्यात धोपाटणे घालून हत्या 
कापड व्यावसायिकाची डोक्यात धोपाटणे घालून हत्या 

ठाणेउल्हासनगरातील कापड व्यावसायिक प्रकाश वाच्छनी (वय - ५४) यांचा कपड्याच्या धोपाटण्याने खून करण्यात आला आहे. याप्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

प्रकाश हे कापड व्यावसायिक असून ते उल्हासनगर येथील हरी ओम अपार्टमेंटमध्ये राहतात. बुधवारी रात्री १२. ०६ वाजताच्या सुमारास त्यांच्या घरी घुसून एका अज्ञात इसमाने धोपाटण्याने डोक्यात प्रहार करून हत्या केली. अज्ञात इसमाने घटनास्थळाहून हत्या करून लागलीच पळ काढला. अद्याप अज्ञात आरोपी कोण हे कळले नसून आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. 


Web Title: Washing the head of a textile businessman and killing him
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.