Video : दादर फुल मार्केटमध्ये भिंत कोसळली; तीनजण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 08:51 PM2019-06-28T20:51:45+5:302019-06-28T20:52:56+5:30

तिघांना उपचारासाठी परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

The wall collapsed in Dadar full market; Three injured | Video : दादर फुल मार्केटमध्ये भिंत कोसळली; तीनजण जखमी 

Video : दादर फुल मार्केटमध्ये भिंत कोसळली; तीनजण जखमी 

Next

मुंबई - दादर पश्चिमेकडील प्रसिद्ध फुल मार्केटमध्ये मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून दिनकर तोडावले(३५), विजय नागर(४०), चेतन ताठे (२८) हे तीनजण जखमी झाले आहे. त्या तिघांना उपचारासाठी परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दादर येथील सेनापती बापट मार्गावर कामगार मैदानाजवळ असलेल्या या फूल मार्केटमध्ये मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस हजर झाले आणि त्यांनी तात्काळ मदतकार्य सुरु केले होते. 


Web Title: The wall collapsed in Dadar full market; Three injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.