Video : वसईतून अडीच हजार किलो बनावट पनीर जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 07:12 PM2019-02-14T19:12:29+5:302019-02-14T19:14:42+5:30

लाखोंचं आरोग्यास हानिकारक बनावट पनीर जप्त हानीकारक 

Video: Two thousand kg of fake paneer seized from Vasai | Video : वसईतून अडीच हजार किलो बनावट पनीर जप्त

Video : वसईतून अडीच हजार किलो बनावट पनीर जप्त

ठळक मुद्देकाल पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई करून तब्बल अडीच हजार किलो पनीर जप्त केले आहे.अजय डेअरी येथे अंदाजे ७०० किलो आणि साईनाथ डेअरी येथे १८०० किलो असे एकूण अडीच हजार किलो बनावट भेसळयुक्त बनावट पनीर आणि  पनीर बनविण्याचे साहीत्य जप्त करण्यात आले आहे.

वसई - वसईतील एका डेअरीमध्ये बनावट आणि भेसळयुक्त पनीर बनविले जात असल्याचे उघड झाले आहे. काल पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई करून तब्बल अडीच हजार किलो पनीर जप्त केले आहे.

वसई विरार शहरातील अनेक उपहार गृहे, रिसॉर्ट आणि ढाब्यामध्ये बनावट पनीर वितरित केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार काल पोलिसांनी चिंचोटी कामण रोडवर असलेल्या अजय  आणि साईनाथ डेअरी या दोन ठिकाणी छापा घातला. यावेळी आरोग्यासाठी घातक असे भेसळयुक्त आणि बनावट पनीर बनवले जात असल्याचे आढळून आले. याठिकाणी अन्न सुरक्षेच्या कुठल्याही नियमांचे पालन न करता अत्यंत अस्वच्छ वातावरणात आरोग्यास हानिकारक पनीर बनविण्यात येत होते.

अजय डेअरी येथे अंदाजे ७०० किलो आणि साईनाथ डेअरी येथे १८०० किलो असे एकूण अडीच हजार किलो बनावट भेसळयुक्त बनावट पनीर आणि  पनीर बनविण्याचे साहीत्य जप्त करण्यात आले आहे. त्याची किंमत साडेसात लाख रुपये आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पनीरचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. या दोन्ही डेअरीचे युनिट बंद करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

Web Title: Video: Two thousand kg of fake paneer seized from Vasai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.