गांजा वैध करायला सांगणाऱ्या उदय चोप्राला मुंबई पोलिसांनी ट्विटरवर झापले 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 09:16 PM2018-09-15T21:16:27+5:302018-09-15T21:17:42+5:30

उदय चोप्राने गांजा भारतात वैध करण्याची मागणी करणारे ट्विट केले होते. त्या ट्विटला रिप्लाय देत मुंबई पोलिस कायमच ट्विटवर अॅक्टीव्ह असतात हे सिद्ध केलं. 

Uday Chopra, who is telling Ganj to be legalized was fired by the Mumbai Police on tweeter | गांजा वैध करायला सांगणाऱ्या उदय चोप्राला मुंबई पोलिसांनी ट्विटरवर झापले 

गांजा वैध करायला सांगणाऱ्या उदय चोप्राला मुंबई पोलिसांनी ट्विटरवर झापले 

मुंबई -  मुंबई पोलिसांनी आज केलेले ट्विट अभिनेता उदय चोप्राला थेट समज देणारे आहे. या ट्विटमध्ये भारतामध्ये इतक्यात तरी गांजा विक्री आणि सेवनाला कायदेशीर मुभा  मिळणार नाही असा इशारा पोलिसांनी दिला आहे. उदय चोप्राने गांजा भारतात वैध करण्याची मागणी करणारे ट्विट केले होते. त्या ट्विटला रिप्लाय देत मुंबई पोलिस कायमच ट्विटवर अॅक्टीव्ह असतात हे सिद्ध केलं.  

मात्र, अभिनेता उदय चोप्राच्या ट्विटकडे मुंबई पोलिसांचेही लक्ष वेधले गेले असून त्यांनी उदयला यावरून चांगलेच झापले आहे. या ट्विटमध्ये पोलिस उदय चोप्राला तुम्ही भारताचे नागरिक असल्याने अशा व्यासपीठावरून आपले मत मांडू शकता असे नमूद करतात. तसेच पोलिसांनी ट्विटमध्ये सध्या तुम्ही ही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की; गांजाचे सेवन करणे, गांजा बाळगणे आणि त्याची तस्करी करणे कायद्याने गुन्हा आहे. नारकोटिक ड्रग्स अॅण्ड सायकोट्रॉफिक सब्स्टेंसेस अॅक्ट १९८५ नुसार गांजा सेवन, गांजा बाळगणे आणि तस्करी करण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. याबद्दलची माहिती इतरांपर्यंत पोहचवा असे म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी हे रिप्लाय दिलेले ट्विट पीन करुन ठेवले आहे. म्हणजेच जो मुंबई पोलिसांच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवर भेट देईल तेव्हा त्याला हे ट्विट सर्वप्रथम दिसेल.

भारतात गांजा वैध करा, अभिनेता उदय चोप्राचे ट्वीट 

Web Title: Uday Chopra, who is telling Ganj to be legalized was fired by the Mumbai Police on tweeter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.