13 वर्षीय मुलाने आई, बहीण, आजोबसह केली एका महिलेची हत्या आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 09:36 AM2022-11-07T09:36:39+5:302022-11-07T09:36:52+5:30

Crime News : इथे एका 13 वर्षीय मुलाने आपली आई, बहीण आणि आजोबासहीत शेजारी राहणाऱ्या महिलेची हत्या केली. नंतर सगळे मृतदेह एका खड्ड्यात पुरले. ही घटना कमलपूरची आहे.

Tripur 13 years old minor boy held for killing four including mother sister and grandfather | 13 वर्षीय मुलाने आई, बहीण, आजोबसह केली एका महिलेची हत्या आणि मग....

13 वर्षीय मुलाने आई, बहीण, आजोबसह केली एका महिलेची हत्या आणि मग....

googlenewsNext

Crime News : त्रिपुराच्या धलाई जिल्ह्यात आपल्याच परिवारातील तीन लोकांसहीत एका महिलेच्या हत्येच्या आरोपात एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. इथे एका 13 वर्षीय मुलाने आपली आई, बहीण आणि आजोबासहीत शेजारी राहणाऱ्या महिलेची हत्या केली. नंतर सगळे मृतदेह एका खड्ड्यात पुरले. ही घटना कमलपूरची आहे.

एसपी रमेश यादव यांनी सांगितलं की, सूचना मिळाली होती की, 13 वर्षीय मुलाने परिवारातील 3 लोकांसहीत शेजारी राहणाऱ्या एका महिलेची हत्या केली. पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी खड्ड्यातील चारही मृतदेह बाहेर काढले. यातील तीन मृतदेह महिलांचे आणि एक मृतदेह वृद्धाचा होता.

पोलिसांनी लगेच अल्पवयीन आरोपीला अटक केली आणि त्याची चौकशी केली. 5 नोव्हेंबरला या मुलाने चार जणांची धारदार हत्याराने हत्या केली. मग घराजवळच खड्डा करून त्यात मृतदेह पुरले. आजूबाजूच्या लोकांना हे समजलं त्यांनीच पोलिसांना सूचना दिली.

एसपी यादव यांनी सांगितलं की, मृतांमध्ये 70 वर्षीय बादल देबनाथ, 32 वर्षीय समिता देबनाथ, 10 वर्षीय सुपर्णा देबनाथ आणि 42 वर्षीय रेखा देब यांचा समावेश आहे. बादल देबनाथ आरोपीचा आजोबा होता. तर समिता त्याची आई आणि सुपर्णा त्याची बहीण होती. तर रेखा आरोपीची शेजारी होती. आरोपीची चौकशी केली जात आहे. त्याने हत्या का केली आणि कशी केली हे जाणून घेतलं जात आहे.

Web Title: Tripur 13 years old minor boy held for killing four including mother sister and grandfather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.