सोन्याचे बिस्किट देण्याच्या बहाण्याने तीन लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 07:49 PM2019-03-28T19:49:53+5:302019-03-28T19:50:54+5:30

सोन्याचे बिस्किट देण्याच्या बहाण्याने एकाची तीन लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Three lakh fraud due to attraction of gold biscuit | सोन्याचे बिस्किट देण्याच्या बहाण्याने तीन लाखांची फसवणूक

सोन्याचे बिस्किट देण्याच्या बहाण्याने तीन लाखांची फसवणूक

googlenewsNext

पिंपरी : सोन्याचे बिस्किट देण्याच्या बहाण्याने एकाची तीन लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश गोपाळ साळवे, संजय कार्ले (रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी राजेंद्र बाळासाहेब आकले (वय २७, रा. घोडेगाव, जुन्नरफाटा, ता. आंबेगाव. जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार , आकले व आरोपी यांच्यात सोन्याचे बिस्किट खरेदीबाबत यापूर्वी व्यवहार झाला होता. त्यामध्ये आकले यांना फायदा झाल्याने आरोपीने  त्यांना आणखी दोन बिस्किटे देतो असे सांगितले. तसेच त्यावर जास्त डिस्काउंट मिळेल सांगत फिर्यादीकडून ५ लाख ८० हजार रुपये घेतले. मात्र, त्यानंतर केवळ १०० ग्रॅम वजनाचे एक बिस्किट देवून दुसरे थोड्या वेळाने देतो असे सांगितले. मात्र, बिस्किट अथवा पैसे परत न करता आरोपींनी फिर्यादी आकले यांची ३ लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

Web Title: Three lakh fraud due to attraction of gold biscuit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.