प्रेमप्रकरणाची माहिती घरी सांगण्याची धमकी देऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 07:49 PM2019-03-27T19:49:11+5:302019-03-27T19:50:59+5:30

प्रियकराबाबत घरात कोणतीही माहिती न दिल्याने प्रथमेशने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली.

Threats to tell about Premaprakaran's information at home | प्रेमप्रकरणाची माहिती घरी सांगण्याची धमकी देऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार

प्रेमप्रकरणाची माहिती घरी सांगण्याची धमकी देऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार

Next
ठळक मुद्देतरुणीचे एका तरुणाशी प्रेमप्रकरण सुरू असल्याची माहिती प्रथमेशला मिळाली होती. दबावाला बळी पडलेल्या तरूणीवर प्रथमेशने एप्रिल २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत लैंगिक अत्याचार केले.या प्रकरणी तरुणीने बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी प्रथमेश विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.

मुंबई - प्रेमप्रकरणाची माहिती घरी सांगून बदनामी करण्याची धमकी देत तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास बोरिवली पोलिसांनीअटक केली आहे. प्रथमेश शिर्के असं या आरोपीचं नाव आहे. 

गोराई परिसरात राहणाऱ्या तरुणीचा प्रथमेश हा मित्र होता. प्रथमेशला तरुणीच्या घराताल सर्वजण ओळखतात. तरुणीचे एका तरुणाशी प्रेमप्रकरण सुरू असल्याची माहिती प्रथमेशला मिळाली होती. मात्र, तरुणीच्या घरातल्याचा सुरूवातीपासूनच प्रेमविवाहाला विरोध होता. तरुणीने तिच्या प्रियकराबाबत घरात कोणतीही माहिती न दिल्याने प्रथमेशने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. सुरूवातीला तो तरुणीला त्रास देत होता. त्यानंतर तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करू लागला. पीडित तरुणीने सांगितल्याप्रमाणे न केल्यास घरातल्यांना तिच्या प्रेमप्रकरणाची माहिती देऊन बदनामी करण्याची धमकी प्रथमेशने दिली. त्याच्या दबावाला बळी पडलेल्या तरूणीवर प्रथमेशने एप्रिल २०१८ ते जानेवारी २०१९ या कालावधीत लैंगिक अत्याचार केले. नेहमीच्या त्रासाला कंटाळून अखेर तरुणीने ही बाब तिच्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी तरुणीने बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी प्रथमेश विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.

Web Title: Threats to tell about Premaprakaran's information at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.