Crime News: दुर्दैवी, भयानक! तिने आणलेल्या सरपणाचेच सरण रचून तिला जिवंत जाळले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 08:03 AM2022-01-06T08:03:01+5:302022-01-06T08:05:46+5:30

Crime News Maharashtra: चंद्रपूरच्या सुशी गावातील थरकाप उडविणारी घटना. किंचाळण्याचा आवाज ऐकून शेजारी त्या दिशेने धावून आले. दुपारी सुमारे २ च्या सुमारातील घटना. .

terrible Emotional Story! women was burned alive by the firewood she had brought in Chandrapur sushi | Crime News: दुर्दैवी, भयानक! तिने आणलेल्या सरपणाचेच सरण रचून तिला जिवंत जाळले

Crime News: दुर्दैवी, भयानक! तिने आणलेल्या सरपणाचेच सरण रचून तिला जिवंत जाळले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मूल (जि. चंद्रपूर) : संशय कोणत्या थराला घेऊन जाईल, याचा नेम नाही. याच संशयातून एका ७४ वर्षीय इसमाने अंगणातच सरण रचून पत्नीला जिवंत जाळले. समाजमन सुन्न करणारी ही घटना मंगळवारी मूल तालुक्यातील सुशी गावात घडली. मुक्ताबाई गंगाराम शेंडे (६५) असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे, तर गंगाराम सोमाजी शेंडे असे निर्दयी पतीचे नाव आहे.

मुक्ताबाई आणि गंगाराम शेंडे हे वृद्ध दाम्पत्य अख्खे आयुष्य एकमेकांशिवाय जगले नाही. मात्र, आयुष्याच्या संध्याकाळी त्या दाम्पत्यामध्ये संशयाने जागा केली. गंगाराम याही वयात पत्नीवर संशय घेऊ लागला. अशातच दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. गंगारामच्या मनात संशयाने पक्के घर केले होते. मंगळवारी सकाळी मुक्ताबाई अन्न शिजविण्यासाठी लागणारे सरपण आणण्यासाठी लगतच्या जंगलात गेली. ही बाब गंगारामला खटकली. ती सरपण घेऊन दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास घरी परतताच गंगारामने तिच्याशी वाद घालून भांडण केले. तिला बेदम मारहाण केली.

या प्रकरणी मूल पोलिसांनी गुन्हा दाखल करून गंगाराम शेडे याला अटक केली आहे.

n मुक्ताबाईने जंगलातून अन्न शिजविण्यासाठी आणलेल्या सरपणाचे सरण गंगारामने रचले. या सरणावर बळजबरीने मुक्ताबाईला टाकून तिच्या अंगावर डिझेल टाकले आणि आग लावली. या आगीत मुक्ताबाई होरपळत होती. तिचा किंचाळण्याचा आवाज ऐकून शेजारी त्या दिशेने धावून आले. 
n त्यांनी लगेच तिला चंद्रपूरला सामान्य रुग्णालयात नेले. प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचार करून नागपूरला हलविले. मात्र रात्री १ वाजताच्या सुमारास वाटेतच मुक्ताबाईची प्राणज्योत मालवली.
 

Web Title: terrible Emotional Story! women was burned alive by the firewood she had brought in Chandrapur sushi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.