दहावीच्या परीक्षेचा अभ्यास पूर्ण न झाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 02:54 PM2019-02-01T14:54:51+5:302019-02-01T14:55:58+5:30

या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ माजली असून याप्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Student's suicide due to non-completion of SSC exam | दहावीच्या परीक्षेचा अभ्यास पूर्ण न झाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

दहावीच्या परीक्षेचा अभ्यास पूर्ण न झाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

Next
ठळक मुद्देसमता नगर शाळेत शिकणाऱ्या साक्षीचा दहावी परीक्षेचा अभ्यास पूर्ण न झाल्याने तिने सिलिंगच्या खांबाला गळफास लावून आत्महत्या केली. नेमके कोणत्या कारणावरून तिने आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

मुंबई - कांदिवली येथील ठाकूर कॉम्प्लेक्स परिसरात राहणाऱ्या साक्षी केरकर या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ माजली असून याप्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रात्री 8.30 वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. समता नगर शाळेत शिकणाऱ्या साक्षीचा दहावी परीक्षेचा अभ्यास पूर्ण न झाल्याने तिने सिलिंगच्या खांबाला गळफास लावून आत्महत्या केली. काही दिवसांवर तिची बोर्डाची परीक्षा होती. अभ्यास पूर्ण न झाल्यामुळे ती चिंताग्रस्त होती. बुधवारी सायंकाळी ८. ३० वाजताच्या सुमारास तिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सायंकाळी तिचे नातेवाईक घरी आले तेव्हा हा प्रकार उघड झाला. नेमके कोणत्या कारणावरून तिने आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

Web Title: Student's suicide due to non-completion of SSC exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.