Shraddha Murder Case: पोलिसांची टीम आफतबच्या घरी; एक पुतळा अन् क्राइम सीन रिक्रिएट, नेमकं काय घडलं?, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 12:57 PM2022-11-16T12:57:43+5:302022-11-16T12:58:04+5:30

Shraddha Murder Case: आफताबने दिलेल्या माहितीनंतर दिल्ली पोलिसांची टीम रात्री उशीरा दोघं राहत असलेल्या घरी पोहचली.

Shraddha Murder Case: Police went to Aftab Poonawala's house and recreated the crime scene. | Shraddha Murder Case: पोलिसांची टीम आफतबच्या घरी; एक पुतळा अन् क्राइम सीन रिक्रिएट, नेमकं काय घडलं?, पाहा

Shraddha Murder Case: पोलिसांची टीम आफतबच्या घरी; एक पुतळा अन् क्राइम सीन रिक्रिएट, नेमकं काय घडलं?, पाहा

Next

Shraddha Walker Murder Case: संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा हत्याकांड प्रकरणी एकामागून एक नवीन खुलासे होत आहेत. हत्या करणारा आरोपी आफताब अमीन पूनावालाची (Aftab Poonawalla) क्रूरता पाहून सर्वांनाच हादरवून सोडले आहे.

पैसे ट्रान्सफर, इन्स्टाग्राम चॅट अन् चुकीची तारीख; श्रद्धाच्या मृत्यूबाबत कसं उलघडलं गूढ?, पाहा! 

श्रद्धा आणि आफताबची एका डेटिंग अॅपवर ओळख झाली होती. त्यानंतर दोघेही लिव्ह इन-रिलेशनमध्ये राहू लागले. दोघंही वसई येथील रहिवाशी असल्याने त्यांचं जास्त जुळून आलं. दोघंही जास्त जवळीक येण्याचं हेच एक कारण ठरल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच लग्नाच्या बहाण्यानं श्रद्धाला आफताब दिल्लीत घेऊन गेला होता. अनेक दिवस उलटल्यानंतर श्रद्धाने लग्नासाठी तगादा लावल्यामुळे आपण कंटाळून तिची हत्या केल्याची कबूली दिली आहे. तसेच तिचे ३५ तुकडे करुन, दिल्लीच्या परिसरात फेकल्याची माहितीही त्याने दिली आहे. 

'दररोज नवीन अनुभव...'; श्रद्धाची 'ती' पोस्ट ठरली अखेरची, दोघंही गेलेले हिमाचल प्रदेशात!

आफताबने दिलेल्या माहितीनंतर दिल्ली पोलिसांची टीम रात्री उशीरा दोघं राहत असलेल्या घरी पोहचली. पोलिसांची टीम हा सीन रीक्रिएट करण्यासाठी एक पुतळा देखील घेऊन गेली होती. त्यानंतर क्राइम सीन रीक्रिएट केला. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधता यावेत, यासाठी दिल्ली पोलिसांनी आफताबला मेहरौलीच्या जंगलात नेले होते. पोलिसांना आतापर्यंत १२ तुकडे मिळाले आहेत. फॉरेन्सिक तपासणीनंतरच हे तुकडे श्रद्धाचे आहेत, की नाही याची पुष्टी होईल. गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेला चाकूही जप्त केला आहे. 

आफताबने सुरुवातील मुंबई आणि दिल्लीतील पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. पोलिसांनी सांगितले की, आम्ही चौकशी सुरु केली असता आफताब खोटं बोलत होता. तसेच श्रद्धा २२ मे रोजी भांडण झाल्यामुळे घर सोडून निघून गेली होती. घर सोडत असताना श्रद्धाने सोबत फक्त तिचा मोबाईल घेतला होता. बाकीचं सर्व सामान तिने माझ्याकडे ठेवलं होतं, असं आफताबने पोलिसांनी सांगितलं. मात्र पोलिसांनी श्रद्धा आणि आफतबचे कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर अनेक महत्वाचे धागेदोरे समोर आले. 

पोलिसांच्या तपासात एक महत्वाची माहिती हाती लागली. आफताब २२ मेनंतर श्रद्धाच्या संपर्कात नसल्याचं सांगत होता. मात्र यात २६ मे रोजी श्रद्धाच्या नेट बँकिंग अकाऊंट अॅपवरुन आफताबच्या अकाऊंटवर ५४ हजार रुपयांचं ट्रान्झेक्शन झालं होतं. तसेच श्रद्धा घर सोडताना मोबाईल घेऊन गेली होती, अशी माहिती आफताबने दिली. मात्र श्रद्धाच्या फोनचं लोकेशन आफताबच्या घराजवळच दाखवत होतं. ३१ मे रोजी श्रद्धाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिच्या मित्रासोबत चॅटिंग केली होती. त्या दिवसाचं लोकेशन देखील आफताबच्या घराजवळीलचं होतं. त्यामुळे पोलिसांचा आफताबवरील संशय वाढला आणि त्याची चौकशी सुरु झाली. या चौकशीत आफताबने श्रद्धाची हत्या केल्याचं मान्य केलं.

दोघांमधील ते एक साम्य ठरलं घातक; श्रद्धा अन् आफताबची नेमकी जवळीक का झाली?, पाहा

दोन स्टेटमेंटमध्ये तफावत-

आफताब आणि त्याच्या आईला माणिकपूर पोलिसांनी श्रद्धाच्या गायबप्रकरणी पोलिस ठाण्यात ३ नोव्हेंबरला बोलावले होते. आरोपी आफताब याचे ३ नोव्हेंबर आणि त्याआधी दोन वेळा स्टेटमेंट घेतले. पण दोन्ही स्टेटमेंटमध्ये तफावत आढळल्याने माणिकपूर पोलिसांना संशय आल्याने ७ नोव्हेंबरला दिल्लीला गेले होते. 

Web Title: Shraddha Murder Case: Police went to Aftab Poonawala's house and recreated the crime scene.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.