खळबळजनक! गजबजलेल्या सायन रुग्णालयात महिलेवर बलात्कार 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 07:27 PM2019-05-14T19:27:43+5:302019-05-14T19:29:55+5:30

आरोपी दीपक कुंचीकुर्वे धारावी येथे रहायला असून तो रुग्णालयात सफाई कामगार म्हणून काम करतो.

Shocking! Women raped in sion hospital | खळबळजनक! गजबजलेल्या सायन रुग्णालयात महिलेवर बलात्कार 

खळबळजनक! गजबजलेल्या सायन रुग्णालयात महिलेवर बलात्कार 

Next
ठळक मुद्देशुल्कामध्ये सवलत मिळण्यासाठीचा फॉर्म भरण्याच्या बहाण्याने आरोपी पीडित महिलेला पाचव्या मजल्यावर निर्जन ठिकाणी घेऊन गेला.या प्रकरणी सायन पोलिसांनी दीपक अन्नाप्पा कुंचीकुर्वे (३१) या आरोपीला अटक केली आहे.सायन रुग्णालयात बलात्काराची घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

मुंबई - सायन रुग्णालयात  (लोकमान्य टिळक हॉस्पिटल) एका ३७ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.  या प्रकरणी सायन पोलिसांनी दीपक अन्नाप्पा कुंचीकुर्वे (३१) या आरोपीला अटक केली आहे. आरोपी दीपक कुंचीकुर्वे धारावी येथे रहायला असून तो रुग्णालयात सफाई कामगार म्हणून काम करतो.

सायन रुग्णालयात नेहमीच रुग्णांची मोठया प्रमाणावर गर्दी असते. महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक येथे २४ तास तैनात असतात. तरी देखील  सायन रुग्णालयात बलात्काराची घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावर शुक्रवारी ही धक्कादायक घटना घडली. पीडित महिलेची बहिण रुग्णालयात दाखल आहे. बहिणीची देखभाल करण्यासाठी महिला रुग्णालयात आलेली होती. त्यावेळी ही घटना घडली. आरोपी नियमित साफसफाई करण्यासाठी रुग्णालयात येत होता. दरम्यान, पीडित महिलेबरोबर त्याचे बोलणं होत असे. शुल्कामध्ये सवलत मिळण्यासाठीचा फॉर्म भरण्याच्या बहाण्याने आरोपी पीडित महिलेला पाचव्या मजल्यावर निर्जन ठिकाणी घेऊन गेला.

या ठिकाणी त्याने तिच्यावर बलात्कार केला. पीडित महिलेने लगेच या प्रकरणी सायन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी शनिवारी आरोपीला अटक केली. आरोपीविरोधात बलात्काराच्या कलम ३७६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.



 

Web Title: Shocking! Women raped in sion hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.