राऊतांचा कोठडीतील मुक्काम वाढला; जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 07:34 AM2022-10-11T07:34:45+5:302022-10-11T07:35:04+5:30

१०३९ कोटी रुपयांच्या पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीने राऊत यांना १ ऑगस्ट रोजी अटक केली.

Sanjay Raut's stay in custody extended; Adjournment of hearing on bail application | राऊतांचा कोठडीतील मुक्काम वाढला; जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब

राऊतांचा कोठडीतील मुक्काम वाढला; जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी वेळेअभावी तहकूब  करून पुढील सुनावणी १७ ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आली आहे. 

१०३९ कोटी रुपयांच्या पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीने राऊत यांना १ ऑगस्ट रोजी अटक केली. या गैरव्यवहारात राऊत यांची मुख्य भूमिका असल्याचा आरोप ईडीने केला आहे. केवळ राजकीय वैमनस्यातून आपल्याला या प्रकरणात नाहक गोवण्यात आले आहे, असे राऊत यांनी जामीन अर्जात म्हटले आहे. राऊत यांच्यातर्फे युक्तिवाद पूर्ण झाला असून, ईडीतर्फे युक्तिवाद बाकी आहे. मात्र, वेळेअभावी सोमवारी जामीन अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. 

 ‘नवीन चिन्ह पक्षात  क्रांती घडवून आणेल’ 
निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्य बाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवल्यासंदर्भात संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, नवीन चिन्ह पक्षात क्रांती घडवून आणेल. राजकीय पक्षाच्या आयुष्यात चिन्ह गोठवण्याच्या घटना घडतात. काँग्रेसबाबत हे तीनदा घडले. इंदिरा गांधी असतानाही हे घडले होते. जनता पक्षालाही या घटनेस सामोरे जावे लागले होते. नवीन चिन्ह कदाचित पक्षात क्रांती घडवून आणेल. पक्षाचे नाव, चिन्ह बदलेल, पण पक्ष तोच राहील, असे राऊत म्हणाले.

Web Title: Sanjay Raut's stay in custody extended; Adjournment of hearing on bail application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.