राजीव गांधींच्या मारेकऱ्याला 'बर्थ डे' शुभेच्छा, मुंबईत झळकले बॅनर्स

By पूनम अपराज | Published: November 27, 2018 06:03 PM2018-11-27T18:03:59+5:302018-11-27T18:04:55+5:30

26 नोव्हेंबर या त्याच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर मुलुंड येथील मेहुल टॉकीज परिसरात लावण्यात आले. प्रभाकरन हा आमचा नेता असून त्याचा जन्मदिवस हा शौर्य दिवस असल्याचे सांगून  त्याला अभिवादन करण्यासाठी नाम तमिळ कच्ची, नाम तमिलर पार्टी महाराष्ट्र यांनी बॅनर झळकवले आहेत.

Rajiv Gandhi's killer got Happy Birthday banners | राजीव गांधींच्या मारेकऱ्याला 'बर्थ डे' शुभेच्छा, मुंबईत झळकले बॅनर्स

राजीव गांधींच्या मारेकऱ्याला 'बर्थ डे' शुभेच्छा, मुंबईत झळकले बॅनर्स

Next

मुंबई - एलटीटीचा संस्थापक आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा मारेकरी व्ही. प्रभाकरनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स मुलुंड येथील मेहुल टॉकीज परिसरात झळकल्याने एकच खळबळ उडाली आहे . स्वतंत्र तमिळच्या मागणीसाठी व्ही. प्रभाकरन याने एलटीटी या संघटनेची १९७६ साली स्थापना केली होती. तब्बल 32 देशांनी प्रभाकरन याच्या संघटनेला आतंकवादी संघटना म्हणून घोषित केलं होतं. त्यातच 18 मे 2009 साली श्रीलंकन सैन्यासोबत झालेल्या चकमकीत प्रभाकरन ठार झाला.

मात्र, 26 नोव्हेंबर या त्याच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर मुलुंड येथील मेहुल टॉकीज परिसरात लावण्यात आले. प्रभाकरन हा आमचा नेता असून त्याचा जन्मदिवस हा शौर्य दिवस असल्याचे सांगून  त्याला अभिवादन करण्यासाठी नाम तमिळ कच्ची, नाम तमिलर पार्टी महाराष्ट्र यांनी बॅनर झळकवले आहेत. तसेच बॅनरखाली सर्व तमिळ यांनी एकत्र यावं अशा आशयाचा हा बॅनर आहे. हे बॅनर तामिळ भाषेत आहेत. यावर नाम तमिळ कच्ची या पक्षाचा कुठल्याच नेत्याचा नाव नाही. मात्र, एका बॅनरखाली मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी कारवाई करत बॅनर उतरविले असून दोघांवर दंडात्मक कारवाई केली आहे. 

Web Title: Rajiv Gandhi's killer got Happy Birthday banners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.