प्रभादेवीत उत्तर भारतीयाला मारहाण; तीन शिवसैनिकांना बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 17:31 IST2018-10-25T16:55:51+5:302018-10-25T17:31:14+5:30

मारहाण झालेल्या तरुणाचं नावं विशाल पांडे असं आहे. तर शाखाप्रमुख  शैलेश  माळी आणि शिवसैनिक उमेश  पाटील, शेखर भगत अशी आरोपींची नावे आहेत 

Prabhadevi hit North Indians; Three Shiv sainik arrested | प्रभादेवीत उत्तर भारतीयाला मारहाण; तीन शिवसैनिकांना बेड्या

प्रभादेवीत उत्तर भारतीयाला मारहाण; तीन शिवसैनिकांना बेड्या

मुंबई - दादरमधील प्रभादेवी परिसरात शिवसैनिकांनी उत्तर भारतीय तरुणाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. रस्त्यावर स्टॉल  लावण्याच्या वादातून शिवसैनिकांनी उत्तर भारतीय कपडे फाटेपर्यंत तरुणाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी 3 शिवसैनिकांना दादर पोलिसांनी अटक केली आहे. मारहाण झालेल्या तरुणाचं नावं विशाल पांडे असं आहे. तर शाखाप्रमुख  शैलेश  माळी आणि शिवसैनिक दिनेश पाटील, शेखर भगत अशी आरोपींची नावे आहेत 

काल दुपारी ४.०० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. प्रभादेवी भागात स्टॉल का लावला असा जाब विचारत शाखाप्रमुख शैलेश माळी यांनी कार्यकर्त्यांच्या सहाय्यानं स्टॉलचालक तरुणाला मारहाण केली. विशाल पांडे असं मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचं नाव असून त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून ही घटना उघडकीस आली. दिनेश पाटील, शैलेश माळी, आणि शेखर भगत  या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येत असल्याची माहिती दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिवाकर शेळके यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली.  

दादरमध्ये उत्तर भारतीयाला शिवसेनेने चोपले; रस्त्यावर स्टॉल लावण्यावरून वाद

Web Title: Prabhadevi hit North Indians; Three Shiv sainik arrested