पोलीस आयुक्तांच्या फसवणुकीचा कट फसला; 2 वर्षांनी तरुणाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 06:01 PM2019-03-28T18:01:40+5:302019-03-28T18:02:51+5:30

आशिषकुमार असं या तरुणाचे नाव असून तो ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा सदस्य असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. 

Police commissioner's fraud was unfortunate; afterTwo years the arrest of the youth | पोलीस आयुक्तांच्या फसवणुकीचा कट फसला; 2 वर्षांनी तरुणाला अटक 

पोलीस आयुक्तांच्या फसवणुकीचा कट फसला; 2 वर्षांनी तरुणाला अटक 

googlenewsNext
ठळक मुद्दे११ जुलै २०१७ रोजी संजय बर्वे यांना हा फसवणुकीचा फोन आला.फोनवरील व्यक्तीने स्वत:ची ओळख स्टेट बँक ऑफ इंडियाचा अधिकारी असल्याची बतावणी केली होती.ऑनलाइन फसवणुकीविषयी माहिती असल्याने संजय बर्वे यांनी तपशील देणे टाळले. तसेच या प्रकरणी सायबर शाखेकडे तक्रारही केली.

मुंबई - मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनीअटक केली आहे. आशिषकुमार झा असं या आरोपी तरुणाचे नाव असून तो झारखंडचा रहिवासी आहे. दोन वर्षांपूर्वी आशिषकुमारने संजय बर्वे यांना फोन करुन त्यांच्या बँक खात्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सायबर फसवणुकीविषयी माहिती असल्याने संजय बर्वे यांनी त्याला माहिती देणे टाळले आणि या प्रकरणी थेट पोलिसांकडे तक्रार केली होती. आशिषकुमारच्या वकिलांनी मात्र पोलिसांचा हा दावा फेटाळून लावला आहे. आशिषकुमारने सेकंड हँड मोबाईल खरेदी केला होता, ऑनलाइन फसवणूक करणारी टोळी मोबाईल फोनचा वापर केल्यानंतर तो फोन बाजारात विकत असतील, असा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे.

दोन वर्षांपूर्वी संजय बर्वे हे राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (एसीबी) प्रमुखपदी कार्यरत होते. ११ जुलै २०१७ रोजी संजय बर्वे यांना हा फसवणुकीचा फोन आला. फोनवरील व्यक्तीने स्वत:ची ओळख स्टेट बँक ऑफ इंडियाचा अधिकारी असल्याची बतावणी केली होती. तुमचे क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्यात आले असून कार्ड अनब्लॉक करण्यासाठी कार्डवरील १६ आकडी नंबर, पिन नंबर आणि सीव्हीव्ही आदी तपशील लागेल असं त्या व्यक्तीने संजय बर्वे यांना सांगितले. ऑनलाइन फसवणुकीविषयी माहिती असल्याने संजय बर्वे यांनी तपशील देणे टाळले. तसेच या प्रकरणी सायबर शाखेकडे तक्रारही केली. फसवणुकीचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. अखेर दोन वर्षांनी पोलिसांनी झारखंडमधून १९ वर्षांच्या तरुणाला अटक केली. आशिषकुमार असं या तरुणाचे नाव असून तो ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा सदस्य असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. 

 

Web Title: Police commissioner's fraud was unfortunate; afterTwo years the arrest of the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.