महिला पोलीस बनली पत्नी! वेषांतर करून लहान मुलांच्या तस्करीच्या रॅकेटचा केला पर्दाफाश

By पूनम अपराज | Published: August 2, 2022 01:47 PM2022-08-02T13:47:47+5:302022-08-02T14:16:57+5:30

Child trafficking : याप्रकरणी अँटॉप हिल पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७० (४), जे जे ऍक्ट २०१५ कलम ७५, ८०, ८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Police became a wife! A child trafficking racket busted in mumbai | महिला पोलीस बनली पत्नी! वेषांतर करून लहान मुलांच्या तस्करीच्या रॅकेटचा केला पर्दाफाश

महिला पोलीस बनली पत्नी! वेषांतर करून लहान मुलांच्या तस्करीच्या रॅकेटचा केला पर्दाफाश

Next

पूनम अपराज 

मुंबई : एका 35 वर्षीय महिलेला आणि तिच्या महिला साथीदाराला 15 दिवसांच्या चिमुरडीला 4.5 लाख रुपयांना विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अँटॉप हिल पोलिसांनी सांगितले की, मुख्य आरोपी ज्युलिया फर्नांडिस हिच्यावर मानवी तस्करीच्या अनेक केसेस आहेत. तसेच जीटीबी नगर येथील आनंद नगरमधील अहाना नर्सिंग होममध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. येथून २ मोबाईल आणि २ हजार रुपयांसह महत्वाचे कागदपत्रे जप्त करण्यात आले. याप्रकरणी अँटॉप हिल पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७० (४), जे जे ऍक्ट २०१५ कलम ७५, ८०, ८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

पुण्यातील कोंढवा येथील दत्तक केंद्रात काम करणारे आणि केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (CARA) चे सदस्य असलेल्या जयप्रकाश जाधव यांच्या तक्रारीवरून ही अटक करण्यात आली आहे. मुंबईतील एक महिला नवजात मुलीसाठी खरेदीदार शोधत असल्याची माहिती जाधव यांना मिळाली होती. त्यांनी स्थानिक महिला आणि बालकल्याण प्राधिकरणाला सतर्क केले. त्यावरून ही पुढे कारवाईस चालना मिळाली. 


मुंबई पोलिसांच्या सामाजिक शाखेच्या विशेष बाल संरक्षण युनिटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी फर्नांडिसला पकडण्यासाठी काम  काम सुरु केले आणि जाधव यांना तिच्याशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. फोनवर, तिने 4.5 लाखांची मागणी केली आणि सांगितले की ४ लाख बाळाच्या पालकांना दिले जातील आणि बाकीचे ती तिचे कमिशन म्हणून ठेवेल. फर्नांडिसने जाधव यांना रविवारी सायन कोळीवाडा येथील अहाना नर्सिंग होमला भेट देण्यास सांगितले. जाधव यांच्यासोबत एक पोलीस हवालदार होता, जो त्याची पत्नी म्हणून उभा होता, सिव्हिल वेशातील अनेक पोलीस परिसरात वेढा घालून होते.

नर्सिंग होममध्ये नवजात अर्भकाला तिची केअरटेकर शबाना शेख (३०) घेऊन आली होती. पैशाची देवाणघेवाण होताच दोन्ही महिलांना अटक करण्यात आली. नर्सिंग होमची कोणतीही नोंदणी पोलिसांना आढळून आली नाही. या प्रकरणात त्याची भूमिका तपासत आहे. दोन महिलांवर मानवी तस्करी आणि बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, फर्नांडिसला मानखुर्द आणि वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांनी अशाच गुन्ह्यांसाठी अटक केली होती.

Web Title: Police became a wife! A child trafficking racket busted in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.