अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या भामट्याला नवी मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 16:33 IST2018-09-26T23:48:40+5:302018-09-27T16:33:40+5:30

नवी मुंबई पोलिसांनी या विकृताची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षिसही जाहीर केले होते.

Navi Mumbai Police detained for cheating sexual assault on minor girls | अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या भामट्याला नवी मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या भामट्याला नवी मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबई - मुंबई - मुंबई आणि ठाण्यात, नवी मुंबईत अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार कऱणारा विकृत नालासोपाऱ्यात दाखल झाला होता. चार दिवसात त्याने दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले. त्याचा माग काढण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, गुन्हे प्रकटीकरण शाखेसह पोलिसांनी अनेक पथके बनवली. जनजागृती करत पोलिसांनी या सिरीयल मॉलेस्टरचे सीसीटीव्हीत सापडलेले छायाचित्र मोठमोठ्या बॅनरवर लावण्यात आले होते. तसेच नवी मुंबई पोलिसांनी या विकृताची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षिसही जाहीर केले होते. त्यांनतर आज नवी मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी नेहान अन्सारीला मीरा रोड येथील एका बारबाहेरून अटक केली.
हा भामटा ८ ते १३ वर्ष वयोगटातील अल्पवयीन मुलींना लक्ष्य करायचा. त्यांना गाठून तुझ्या पालकांनी बोलावले आहे, तुझ्या बाबांनी तुला पत्र दिले आहे, असे सांगून परिसरातील एखाद्या इमारतीच्या गच्चीवर नेऊन जातो. तिथे तुझ्या अंगावर किडा पडला आहे, असे सांगून कपडे काढण्यास भाग पाडून लैंगिक अत्याचार करतो.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथे गेल्या काही दिवसांपासून आरोपी नेहानने अल्पवयीन मुलींना फूस लावून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. मुंबई आणि ठाण्यात, नवी मुंबईत अल्पवयीन मुलींवर बलात्कार कऱणारा विकृत नालासोपाऱ्यात दाखल झाला होता. चार दिवसात त्याने दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले. त्याच्या माग काढण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, गुन्हे प्रकटीकरण शाखेसह पोलिसांनी अनेक पथके बनवली. जनजागृती करत पोलिसांनी या सिरीयल मॉलेस्टरचे सीसीटीव्हीत सापडलेले छायाचित्र मोठमोठ्या बॅनरवर लावण्यात आले होते. तसेच नवी मुंबई पोलिसांनी या विकृताची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षिसही जाहीर केले होते. त्यांनतर आज नवी मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी नेहान अन्सारीला मीरा रोड येथील एका बारबाहेरून अटक केली.
हा भामटा ८ ते १३ वर्ष वयोगटातील अल्पवयीन मुलींना लक्ष्य करायचा. त्यांना गाठून तुझ्या पालकांनी बोलावले आहे, तुझ्या बाबांनी तुला पत्र दिले आहे, असे सांगून परिसरातील एखाद्या इमारतीच्या गच्चीवर नेऊन जातो. तिथे तुझ्या अंगावर किडा पडला आहे, असे सांगून कपडे काढण्यास भाग पाडून लैंगिक अत्याचार करतो.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथे गेल्या काही दिवसांपासून आरोपी नेहानने अल्पवयीन मुलींना फूस लावून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत.

Web Title: Navi Mumbai Police detained for cheating sexual assault on minor girls