तरुणीचा प्रेमसंबंधातून ओढणीने गळा दाबून खून, पोलिसांनी काही तासांतच आरोपीला ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 12:02 AM2018-09-27T00:02:10+5:302018-09-27T00:02:37+5:30

तरुणीचा ओढणीने गळा दाबून खुन करणा-यास पोलिसांनी काही तासात अटक केली़ प्रेमसंबंधातील भांडणातून रागाच्या भरात त्याने खुन केल्याचे उघडकीस आले आहे.

murder in lohgaon, one arrested | तरुणीचा प्रेमसंबंधातून ओढणीने गळा दाबून खून, पोलिसांनी काही तासांतच आरोपीला ठोकल्या बेड्या

तरुणीचा प्रेमसंबंधातून ओढणीने गळा दाबून खून, पोलिसांनी काही तासांतच आरोपीला ठोकल्या बेड्या

Next

 पुणे - लोहगाव येथील फॉरेस्ट पार्क येथील जंगलात तरुणीचा ओढणीने गळा दाबून खुन करणा-यास पोलिसांनी काही तासात अटक केली़ प्रेमसंबंधातील भांडणातून रागाच्या भरात त्याने खुन केल्याचे उघडकीस आले आहे.
उमा बबन कापसे (वय १८, रा़  खुळेवाडी विमाननगर) असे या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी परमेश्वर बोवाळ (वय १९, रा़ बोराडेवस्ती, चंदननगर) असे आरोपीचे नाव आहे. 
याबाबतची माहिती अशी, उमा कापसे आणि परतेश्वर यांच्यात पूर्वीपासून प्रेमसंबंध होते़ परंतु, परमेश्वरच्या व्यसनाला उमाचा विरोध होता़ त्यामुळे त्यांच्यात नेहमी वादावादी होत असे़ त्यात उमा हिची दौंड येथील एका युवकाबरोबर ओळख झाली होती़ परमेश्वरला ते आवडत नव्हते़ त्यामुळे त्यांच्यात नेहमी वादावादी सुरु होती़ परमेश्वरने त्या युवकाची माहिती काढली व त्याला उमाला भेटू नकोस अशी दमदाटी केली होती़ परमेश्वर याने त्याला बुधवारी भेटायला बोलावले होते़ पण तो काही आला नाही़ त्याऐवजी त्याला उमा भेटली़ त्याने उमाला तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणून दुचाकीवरुन लोहगाव येथील फॉरेस्ट पार्कला घेऊन जाऊ लागला़ ते दुचाकीवरुन जात असताना त्या युवकाचा उमाला फोन आला़ त्यावरुन त्यांच्यात पुन्हा वाद झाला़ रागाच्या भरात परमेश्वरने उमाच्याच ओढणीने तिचा गळा आवळला़ त्यात तिचा मृत्यु झाला़ हे पाहून परमेश्वर पळून गेला़ फॉरेस्ट पार्कमध्ये तरुणी पडली असल्याची माहिती विमानतळ पोलिसांना दुपारी अडीचच्या सुमारास लोकांनी कळविली़ याची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त गणेश गावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे व त्यांच्या सहकाºयांनी घटनास्थळी भेट दिली़ उमा हिची ओळख पटल्यावर गावडे यांनी चंदननगर, येरवडा, विमानतळ पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या़ चंदननगर पोलिसांनी गाडी नंबरवरुन त्याला रात्री ताब्यात घेतले़ विमानतळ पोलिसांनी त्याला अटक केली असून खुनाची माहिती मिळाल्यानंतर काही तासात आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे़

Web Title: murder in lohgaon, one arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.