युवक सहकारी पतपेढीतील कोट्यावधींचा घोटाळा, पाच जणांना अटक तर एक फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 08:35 PM2018-09-12T20:35:12+5:302018-09-12T20:35:32+5:30

काही वर्षापासून पतसंस्थेतील बचत ठेव, आवर्तन ठेव, मुदत ठेव, तारण ठेवलेले सोने यात बेकायदा व्यवहार करून, संगनमताने बनावट दस्तावेज , खोट्या नोंदी करून साडे आठ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला होता. 

A multi-millionaire scam of Youth Co-operative Credit, five people were arrested and one absconding | युवक सहकारी पतपेढीतील कोट्यावधींचा घोटाळा, पाच जणांना अटक तर एक फरार

युवक सहकारी पतपेढीतील कोट्यावधींचा घोटाळा, पाच जणांना अटक तर एक फरार

Next

वसई - वसईतील प्रसिध्द युवक सहकारी पतपेढी मधील साडेआठ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात शाखा व्यवस्थापकासह पाच जणांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. काही वर्षापासून पतसंस्थेतील बचत ठेव, आवर्तन ठेव, मुदत ठेव, तारण ठेवलेले सोने यात बेकायदा व्यवहार करून, संगनमताने बनावट दस्तावेज , खोट्या नोंदी करून साडे आठ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला होता. 

वसईतील भंडारी समाजातर्फे युवक सहकारी पतपेढी चालविण्यात येते. वसईच्या पारनाका येथे पतपेढीचे मुख्यालय असून नालासोपारा येथे एक शाखा आहे. मात्र या पतपेढीत खातेदाराच्या आणि सभासदांच्या रकमेचा अपहार होत असल्याची बाब समोर आली होती. पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश चौधरी यांनी याप्रकरणी तक्रार दिली होती. मागील बारा वर्षापासून हा अपहार करण्यात येत होता. . या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पतपेढीत ८ कोटी ५६ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकऱणी पतपेढीच्या सहा कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल कऱण्यात आले होते त्यात निवृत्त व्यवस्थापक मगनचंद राठोड, वसई शाखा व्यवस्थापक अविनाश चोरघे, सोपारा येथील शाखा व्यव्थापक रितेश म्हात्रे, रोखपाल सुरज ठाकूर, लिपिक समीर पाटील, शिपाी संजय चौधरी आदीचा समावेश आहे. त्यांच्यावर भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ४०६, ४०९, ४६८, ४७१, ४७७ (अ) ४२०, ३४, सह एमपीआयडी अॅक्ट १९९९ चे कलम १४६(प), १४६(प), महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संचालाकंनी पतपेढीतीस सहा कर्मचाऱ्यांना यापूर्वीच बडतर्फ करून त्यांच्याविरोधात निबंधक आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

या प्रकरणाचा तपास पालघरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे होता. याप्रकऱणी निवृत्त व्यवस्थापक मगनचंद राठोड, वसई शाखा व्यवस्थापक अविनाश चोरघे, सोपारा शाखा व्यवस्थापक रितेश म्हात्रे, रोखपाल सूरज ठाकुर, लिपिक समीर पाटील. यांना अटक करण्यात आली. तर शिपाई संजय चौधरी फरार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रताप बोस यांनी दिली. 

Web Title: A multi-millionaire scam of Youth Co-operative Credit, five people were arrested and one absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.