प्रेम, लग्न आणि फोन! पत्नीचा फोन सतत येत होता बिझी, पतीने उचललं हे धक्कादायक पाउल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 06:01 PM2021-08-03T18:01:26+5:302021-08-03T18:03:34+5:30

ही घटना १ महिन्यापूर्वी म्हणजे १ जुलैची आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्या महिलेचा मृतदेह घरात आढळून आला होता. पतीने पोलिसांना पत्नी मृत असल्याची सूचना दिली होती.

MP : Wife busy on another call husband killed in character suspicion | प्रेम, लग्न आणि फोन! पत्नीचा फोन सतत येत होता बिझी, पतीने उचललं हे धक्कादायक पाउल

प्रेम, लग्न आणि फोन! पत्नीचा फोन सतत येत होता बिझी, पतीने उचललं हे धक्कादायक पाउल

googlenewsNext

मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यातील नामलीमध्ये गेल्या ४ जुलैला घरात मृत आढळून आलेल्या महिलेच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. महिलेच्या पतीने तिची गळा दाबून हत्या केली होती. पत्नीचा फोन सतत बिझी येत असल्याने तिची हत्या केल्याचं पतीने सांगितलं. पतीला पत्नीच्या चारित्र्यावर शंका होता आणि यातच त्याने तिची हत्या केली.

ही घटना १ महिन्यापूर्वी म्हणजे १ जुलैची आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्या महिलेचा मृतदेह घरात आढळून आला होता. पतीने पोलिसांना पत्नी मृत असल्याची सूचना दिली होती. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पतीची चौकशी केल्यावर त्याने सांगितलं की, तो शेतात गेला होता. सकाळी जेव्हा घरी परतला तेव्हा पत्नी उठली नाही. तेव्हा त्याने पोलिसांना सूचना दिली. (हे पण वाचा : धक्कादायक! लग्नासाठी मागे लागली होती प्रेयसी, प्रियकराने दिलं नदीत ढकलून)

मात्र, पोस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा झाला. रिपोर्टमधून समोर आलं की, मृत महिला आरतीची गळा आणि तोंड दाबून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली तर तिचा पती रणजीत याची भूमिका संशयास्पद वाटली. यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली तेव्हा त्याने गुन्हा मान्य केला.

आरोपी पती रणजीतने सांगितलं की, त्याने घरच्यांच्या विरोधात जाऊन २०१४ मध्ये आरतीसोबत  प्रेमविवाह केला होता. त्याला ४ वर्षाची मुलगी आणि ६ वर्षांचा मुलगा आहे.  पण काही दिवसांपासून पत्नीचा फोन सतत व्यस्त येत होता. त्यामुळे त्याला वाटलं की, पत्नी दुसऱ्या कुणासोबत बोलत आहे. चारित्र्यावर संशय असल्याने त्याने तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
 

Web Title: MP : Wife busy on another call husband killed in character suspicion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.