खोटी माहिती देऊन पोलिसांची केली दिशाभूल; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 07:25 PM2018-08-13T19:25:38+5:302018-08-13T19:27:44+5:30

पोलिसांची दिशाभूल करत खोटी माहिती दिल्याचे उघड झाल्याने तरुणाविरुद्ध जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना रविवारी घडली. 

Misconceptions made by police by giving false information; The accused filed the complaint | खोटी माहिती देऊन पोलिसांची केली दिशाभूल; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल 

खोटी माहिती देऊन पोलिसांची केली दिशाभूल; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल 

googlenewsNext

जिंतूर (परभणी ) : शहरातील भाजी मंडई मधील एका खाजगी मालकीच्या विवादित जागेवर बंद अवस्थेत असलेले बांधकाम सुरु असल्याची माहिती एका तरुणाने जिल्हा पोलीस प्रमुखांना दिली. मात्र ही माहिती खोटी असल्याचे उघड झाल्याने तरुणाविरुद्ध जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना रविवारी घडली. 

या बाबत अधिक माहिती अशी की, शहरातील भाजी मंडई मधील एका खाजगी मालकीच्या विवादित जागेवर  शेख सलिम शेख लतीफ यांचे व्यापारी संकुलाचे बांधकाम सुरु होते. हे बांधकाम अवैध असल्याची तक्रार आवेस खान पठाण याने पोलीसाकडे केली होती. त्यामुळे शहर पोलिसानी ते बांधकाम शनिवारी (दि.११ ) रोखले. तसेच आवेस पठाण यांना सदरील जागेचे कागदपत्र रविवारी (दि. १२ ) आणून दाखवण्याबाबत नोटीस दिली.  

यावर आवेस खान पठाण यांने शहर पोलिसांना कागदपत्र न दाखवता शनिवारचे जुनेच फोटो दाखवत रविवारी विवादित जागेवर बांधकाम सुरू असल्याचे भासवले. तसेच ती छायाचित्रे जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या भ्रमध्वनीवर पाठवले. त्या वरून जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी जिंतूर पोलीस निरीक्षक यांना भ्रमधवणीवर संपर्क साधून सदरील अवैध बांधकाम बंद करण्याचे आदेश दिले. 

यानंतर शहर पोलीसांनी विवादित जागेला भेट देऊन पाहणी केली असता तेथे काम बंद होते. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना माहिती देण्यात आली. यासोबतच आवेस पठाण हा पोलिसांना खोटी माहिती देऊन त्यांची दिशाभूल करत असल्याचे उघड झाल्याने फौजदार सुरेश नरवाडे यांनी त्याच्याविरुद्ध कलम १८२, १८६, १९३, २११ या प्रमाणे गुन्हा दाखल केला. 

आवेस पोलीस ठाण्यातून पळाला 
आपण केलेल्या तक्रारी बाबत पोलिसांनी कोणती कार्यवाही केली याचा जाब विचारण्यासाठी आवेस रविवार संध्याकाळी ठाण्यात आला. मात्र त्याच्या विरूद्धच पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगताच त्याने तेथून धूम ठोकली.

Web Title: Misconceptions made by police by giving false information; The accused filed the complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.