Maratha Reservation माथाडी कामगाराची गळफास लावून आत्महत्या; सुसाईट नोटमध्ये मराठा आरक्षणाचा उल्लेख
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 14:56 IST2018-08-04T14:54:37+5:302018-08-04T14:56:13+5:30
आज पहाटे ५ वाजता २६ वर्षीय तरुणाने केली राहत्या घरात केली आत्महत्या; आत्तेभावाकडे पोलिसांना सापडली सुसाईट नोट

Maratha Reservation माथाडी कामगाराची गळफास लावून आत्महत्या; सुसाईट नोटमध्ये मराठा आरक्षणाचा उल्लेख
नवी मुंबई - तुर्भे गावात आज पहाटे ५ वाजताच्या सुमारास माथाडी कामगाराने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. २६ वर्षीय अरुण भडाले यांनी राहत्या घरी नायलॉन रस्सीने गळफास लावून आत्महत्या केली असून त्याच्या कोपरखैराणे येथे राहणाऱ्या आत्तेभावाकडे सुसाईट नोट सापडली आहे. या सुसाईट नोटमध्ये आर्थिक अडचण आणि मराठा आरक्षणाचा उल्लेख असल्याचे एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी सांगितले. याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
त्याला कर्ज हवे होते, त्यासाठी त्याने अनेक ठिकाणी प्रयत्न केले. मात्र, कुठूनही त्याला कर्ज मिळत नव्हते. कर्ज कशासाठी पाहिजे याबाबत तो कोणाला बोला नव्हता. मात्र आर्थिक परिस्थितीवरून चिंतीत होता. याच कारणावरून गळफास लावून आत्मह्त्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. अरुण भडाले हा अविवाहित होता. राहत्या घरात बाल्कनीत असलेल्या हुकाला नायलॉन रस्सी बांधून गळफास घेत आत्महत्या केली असल्याची माहिती निकम यांनी दिली. तसेच मराठा आरक्षण राज्य सरकार देणार नसल्याचा खळबळजनक उल्लेख आत्तेभावाकडे सापडलेल्या सुसाईट नोटमध्ये आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येणार आहे.
सुसाईट नोट