मल्ल्याची लवकरच कसाबच्या बराकमध्ये रवानगी, संसदीय समितीच्या सदस्यांनी दिली कारागृहाला भेट

By पूनम अपराज | Published: August 30, 2018 07:36 PM2018-08-30T19:36:39+5:302018-08-30T19:39:15+5:30

या शिष्टमंडळाने तुरुंगातील सोयीसुविधांचा आढावा घेतला असून याचा अहवाल लवकरच संसदेत सादर करणार आहेत.

Mallya will soon leave in Kasab's barrack, members of Parliamentary panel meet jail | मल्ल्याची लवकरच कसाबच्या बराकमध्ये रवानगी, संसदीय समितीच्या सदस्यांनी दिली कारागृहाला भेट

मल्ल्याची लवकरच कसाबच्या बराकमध्ये रवानगी, संसदीय समितीच्या सदस्यांनी दिली कारागृहाला भेट

googlenewsNext

 मुंबई - किरकोळपासून गंभीर गुन्ह्यांप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगारांनी खचाखच भरलेल्या मुंबई मध्यवर्ती कारागृह म्हणजेच आर्थर रोड तुरुंगाची पाहणी करण्यासाठी संसदीय समितीच्या सदस्यांचे शिष्टमंडळ आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास आर्थर रोड कारागृहात आले होते. या शिष्टमंडळाने तुरुंगातील सोयीसुविधांचा आढावा घेतला असून याचा अहवाल लवकरच संसदेत सादर करणार आहेत. आर्थर रोड कारागृहाला भेट देणाऱ्या संसदीय समितीच्या सदस्यांच्या शिष्टमंडळात भूपेंद्र यादव (भाजपा)  चेअरमन, संसदीय समिती, सोपान राज गुप्ता (भाजपा)  राज्यसभा सभासद, माजिद मेमन (राष्ट्रवादी) राज्यसभा सभासद,  डी. राजा (सीपीआय) राज्यसभा सभासद, केशव राव (टीआरएस) राज्यसभा सभासद, विवेक तनखा ( काँग्रेस) राज्यसभा सभासद आणि लोकसभा सभासद डॉ. संजू बलियान (भाजपा), कल्याण बॅनर्जी (टीआरएस), भगवंत मान (आप), बी. व्ही. नायर ( काँग्रेस), अॅडव्होकेट वर्मा (आरजेडी) यांचा समावेश होता. 

मुंबईतील आर्थर रोड जेलमधील बराक क्रमांक 12 चं स्वरुप बदलण्यासाठीचे काम गेल्या महिन्याभरापासून जोमाने सुरू आहे. बराकमधील फरश्या बदलण्यात आल्या आहेत, भिंतीवरील रंगकाम देखील पूर्ण झाले आहे आणि बाथरूमची दुरुस्ती करण्यात आली आहे. बँकांना तब्बल हजारो कोटी रुपयांचा चुना लाऊन परदेशात पसार झालेल्या मद्यसम्राट विजय माल्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे. दरम्यान, बराक क्रमांक 12 मध्ये यापूर्वी मुंबई 26/11 हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला ठेवण्यात आले होते. त्यामुळे कसाबच्या बराकमध्ये मल्ल्याची रवानगी होणार यावर शिक्कामोर्तब आहे. तसेच नवी दिल्लीतून वेगाने सर्व हालचाली सुरु झाल्या असल्याचे चित्र आजच्या शिष्टमंडळाच्या कारागृह भेटीवरून स्पष्ट होत आहे. भारतीय कारागृहांची अवस्था अत्यंत वाईट असल्याचं सांगत विजय माल्यानं प्रत्यार्पणासाठी विरोध दर्शवला होता, यासाठी कारागृह प्रशासनाकडून एवढी जय्यत तयारी करण्यात येत असल्याचं बोललं जातं आहे. मल्ल्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यास  त्याला आर्थर रोड कारागृहात कसाबच्या बराकमध्ये ठेवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, यापूर्वीही आर्थर रोड कारागृहाच्या सुरक्षिततेच्या संदर्भातील अहवाल भारताकडून लंडन कोर्टाला सादर करण्यात आला होता.    

तुरुंग प्रशासनाच्या अंतर्गत राज्यात ९ मध्यवर्ती, ३१ जिल्हा, १३ खुली कारागृहे आणि १७२ उपकारागृहे आहेत. परंतु अगदी किरकोळ गुन्ह्यापासून ते गंभीर गुन्ह्यातील अनेक टोळ्यांशी संबंधित असलेले गुन्हेगार आर्थर रोड तुरुंगात आहेत. त्यातच हे कारागृह भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत असल्याने महत्त्वाचे मानले जाते. 

विजय माल्याच्या 'जंगी स्वागता'साठी कायपण; आर्थर रोडच्या बराकीत टाइल्स, रंगकाम अन् कमोड

Web Title: Mallya will soon leave in Kasab's barrack, members of Parliamentary panel meet jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.