महाराष्ट्र पोलीस दल अधिक भक्कम करु - सुबोध जयस्वाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 20:26 IST2019-02-28T20:25:03+5:302019-02-28T20:26:13+5:30

मुंबई - देशपातळीवर महाराष्ट्र पोलीस दलाचा वेगळा लौकिक आहे. ही परंपरा साजेशी ठेवताना राज्य पोलीस दल सर्व अर्थाने अधिक भक्कम, ...

Maharashtra Police force should be stronger - Subodh Jaiswal | महाराष्ट्र पोलीस दल अधिक भक्कम करु - सुबोध जयस्वाल

महाराष्ट्र पोलीस दल अधिक भक्कम करु - सुबोध जयस्वाल

ठळक मुद्दे मावळते प्रमुख दत्ता पडसलगीकर यांच्याकहून त्यांनी साडेतीनच्या सुमारास पदभार स्विकारला. मुंबई पोलीस आयुक्तालयातील आठ महिन्याच्या कामाबद्दल आपण समाधानी आहोत.सुरक्षा व पारदर्शी कारभाराबाबत राबविलेले त्याठिकाणी राबविलेले उपाय आवश्यकतेप्रमाणे राज्यभरात राबविले जातील. पूर्वीच्या चांगल्या योजना , उपक्रम यापुढेही कायम ठेवल्या जातील.

मुंबई - देशपातळीवर महाराष्ट्र पोलीस दलाचा वेगळा लौकिक आहे. ही परंपरा साजेशी ठेवताना राज्य पोलीस दल सर्व अर्थाने अधिक भक्कम, शक्तीशाली करण्यावर आपला भर असेल, असे मनोगत राज्याचे नुतन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी गुरुवारी व्यक्त केले. मावळते प्रमुख दत्ता पडसलगीकर यांच्याकहून त्यांनी साडेतीनच्या सुमारास पदभार स्विकारला. त्यानंतर पत्रकाराशी बोलताना ते म्हणाले,‘ राज्यातील प्रत्येक पोलीस घटकाशी उत्तम समन्वय ठेवून त्याठिकाणची कायदा व सुव्यवस्था आणि प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. शेजारी राष्ट्रबरोबर तणावग्रस्त परिस्थितीमुळे राज्यातील सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम केली जाईल. त्याबाबत वरिष्ठ अधिकारी व घटक प्रमुखांशी बोलून माहिती घेण्यात येत आहे. मुंबई पोलीस आयुक्तालयातील आठ महिन्याच्या कामाबद्दल आपण समाधानी आहोत. सुरक्षा व पारदर्शी कारभाराबाबत राबविलेले त्याठिकाणी राबविलेले उपाय आवश्यकतेप्रमाणे राज्यभरात राबविले जातील. पूर्वीच्या चांगल्या योजना , उपक्रम यापुढेही कायम ठेवल्या जातील.

कोण आहेत सुबोध जयस्वाल?
सुबोध जयस्वाल हे मुळचे बिहारचे असून १९८५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबईत पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत असताना २००६मधील मुंबई बॉम्बस्फोटाच्या तपास पथकात ते होते. त्याचप्रमाणे १९९३च्या तेलगी मुंद्राक घोटाळ्याच्या तपासासाठी स्थापलेल्या विशेष पथकाचे ते प्रमुख होते. त्यांनी या खटल्यामध्ये माजी पोलीस आयुक्त रणजीत शर्मा यांना अटक केली होती. न्यायालयाने मात्र त्यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्ता केली. जायस्वाल यांनी यांनी मुंबईत मध्य विभागाचे अतिरिक्त अप्पर आयुक्त म्हणूनही काम पाहिले आहे. २६ जून २००८ पासून ते केंद्रीय प्रतिनियुक्तीवर होते. त्यामध्ये रॉसह विविध तपास यंत्रणामध्ये काम पाहिले असून त्यानंतर केंद्रीय सचिवालयात कार्यरत होते. गेल्यावर्षी ३० जूनपासून मुंबईच्या आयुक्तपदाचा कार्यभार त्यांच्याकडे होता.
 

Web Title: Maharashtra Police force should be stronger - Subodh Jaiswal