हत्या झालेल्या फॅशन डिझायनरचा पती जिवंत; मुलाकडून पोलिसांची दिशाभूल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 01:49 AM2018-10-09T01:49:02+5:302018-10-09T01:49:17+5:30

अंमली पदार्थांच्या नशेत फॅशन डिझायनर आईला ढकलून तिची हत्या करणाऱ्या लक्ष सिंगचे वडील जिवंत आहेत. वडिलांचे निधन झाल्याचे त्याने खोटेच सांगितले होते.

 Husband of a fashion designer killed; The child is misleading the police | हत्या झालेल्या फॅशन डिझायनरचा पती जिवंत; मुलाकडून पोलिसांची दिशाभूल

हत्या झालेल्या फॅशन डिझायनरचा पती जिवंत; मुलाकडून पोलिसांची दिशाभूल

Next

मुंबई : अंमली पदार्थांच्या नशेत फॅशन डिझायनर आईला ढकलून तिची हत्या करणाऱ्या लक्ष सिंगचे वडील जिवंत आहेत. वडिलांचे निधन झाल्याचे त्याने खोटेच सांगितले होते. हत्येनंतर स्वत: सुनीता सिंग हिला घटस्फोट दिलेले तिचे पती कुलदीप सिंग यांनी सोमवारी पोलिसांकडे हजर राहून सोमवारी जबाब दिला. मतभेदामुळे सात वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोट झाला होता, असे पश्चिम परिमंडळाचे अप्पर आयुक्त मनोजकुमार शर्मा यांनी सांगितले.
अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या लक्ष सिंग (वय २३) याने वडिलांना समोर पाहूनही त्यांना ओळखत नसल्याचे सांगितल्याने पोलीसही गोंधळले. व्यसनामुळे तो विसंगत जबाब देत असल्याचे तपास अधिकाºयांचे म्हणणे आहे.
अंधेरीतील लोखंडवालात राहात असलेल्या सुनीता सिंग यांची गुरुवारी हत्या झाली. आईशी वाद झाल्याने तिला ढकलल्याची कबुली मुलगा लक्षने पोलिसांना दिली. तसेच वडिलांचे सहा वर्षांपूर्वी निधन झाल्याचे सांगितले. मात्र, हत्येबाबतचे वृत्त समजल्यानंतर कुलदीप सिंग हे पोलिसांसमोर हजर झाले. पत्नीशी पटत नसल्याने २०११ मध्ये विभक्त झाल्याचे त्यांनी सांगितले. लक्षने आईच्या अंगात वडील येतात, भूतबाधेच्या उपचारासाठी मांत्रिकाला बोलवायचो, असे पोलिसांना सांगितले. तो रोज विविध किस्से सांगत पोलिसांची दिशाभूल करत असल्याचे उघड झाले आहे. सुनीता सिंग फ्लॅट विकून मुलासह भाड्याच्या घरात राहात होत्या. विकलेल्या फ्लॅटच्या पैशांवर त्यांचा उर्दहनिर्वाह सुरू होता. यातून आई व मुलात वाद होत असे, असे अप्पर पोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा यांनी सांगितले.

Web Title:  Husband of a fashion designer killed; The child is misleading the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.