विमानतळावरून साडेसहा कोटींचं सोनं जप्त; दुबईहून येणाऱ्या प्रवाशाला अटक  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 07:18 PM2019-02-13T19:18:48+5:302019-02-13T19:19:31+5:30

आज मोठी कारवाई करत ४४ सोन्याची बिस्किटं जप्त केली आहेत.

Gold seized from Rajasthan airport; Stuck in Dubai | विमानतळावरून साडेसहा कोटींचं सोनं जप्त; दुबईहून येणाऱ्या प्रवाशाला अटक  

विमानतळावरून साडेसहा कोटींचं सोनं जप्त; दुबईहून येणाऱ्या प्रवाशाला अटक  

Next

 

मुंबई - मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने (एअर इंटेलिजन्स युनिट -एआययू) आज मोठी कारवाई करत ४४ सोन्याची बिस्किटं जप्त केली आहेत. तसेच कोटींची किंमत असलेलं सोन दुबईहुन घेऊन येणाऱ्या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. 

आज कारवाई दरम्यान ५०० ग्राम वजनाची एकूण ४४ सोन्याची बिस्किटं एआययूने जप्त केली आहेत. या सोन्याच्या बिस्किटांची बाजारात ६ कोटी ७४ लाख ४८ हजार २६० इतकी किंमत आहे. या सोन्याच्या बिस्किटांचे वजन २२ किलो असून अटक आरोपीने सोन्याची तस्करी कोणासाठी केली होती याचा तपास एआययू करणार असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या आयुक्त व्ही. रमा मॅथ्यू यांच्या दिली.  

Web Title: Gold seized from Rajasthan airport; Stuck in Dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.