गौरी लंकेश यांच्या हत्येची चौघांकडून कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 19:19 IST2018-08-15T18:14:57+5:302018-08-15T19:19:31+5:30
१६ पैकी चार संशयित आरोपींनी पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कबुली दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापैकी एक संशयित आरोपी महाराष्ट्र आणि दुसरा कर्नाटकातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गौरी लंकेश यांच्या हत्येची चौघांकडून कबुली
कोल्हापूर - नालासोपाऱ्यातून वैभव राऊत, शरद कळसकर आणि पुण्यातून सुधन्वा गोंधळेकर यांना दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी अटक केली. या कारवाई दरम्यान पुणे, सातारा, कोल्हापूर आदी महाराष्ट्रातून धरपकड करत एटीएसने १६ जणांना ताब्यात घेतले होते. या १६ पैकी चार संशयित आरोपींनी पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कबुली दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापैकी एक संशयित आरोपी महाराष्ट्र आणि दुसरा कर्नाटकातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पुन्हा वैभव राऊतच्या घरी एटीएसचे पथक दाखल