बनावट सातबारा दाखवून पाच लाखांची फसवणूक , आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 02:44 AM2019-02-09T02:44:16+5:302019-02-09T02:44:27+5:30

बनावट सातबारा उतारा दाखवून पाच लाखांची फसवणूक करणाऱ्या दिनेश भोईर (२८, रा. रायगड) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने गुरुवारी अटक केली आहे.

Five lakh cheating, showing the fake identity of seven accused | बनावट सातबारा दाखवून पाच लाखांची फसवणूक , आरोपी अटकेत

बनावट सातबारा दाखवून पाच लाखांची फसवणूक , आरोपी अटकेत

Next

ठाणे  - बनावट सातबारा उतारा दाखवून पाच लाखांची फसवणूक करणाऱ्या दिनेश भोईर (२८, रा. रायगड) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने गुरुवारी अटक केली आहे. ठाणेनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील रहिवासी असलेल्या भोईर याने त्याच्या ठाणे जिल्ह्यातील शिरगाव (ता. अंबरनाथ) येथील जमीन मालकीची असल्याचा बनावट सातबारा उतारा मुंबईतील कलीम खान (३८) यांना दाखवला. त्यानुसार, या उता-यावरील ४.२ गुंठे जमिनीचा व्यवहार २२ लाख रुपयांना ठरवून तसे खरेदीखतही त्यांनी केले. त्यानंतर, खान यांच्याकडून पाच लाख रुपये घेऊन उर्वरित १७ लाख रुपये तीन महिन्यांच्या कालावधीत द्यायचे ठरवून बनावट सातबारा उता-यावर व्यवहार केला. याच व्यवहारातून स्वत:च्या नावावर नसलेल्या जमिनीचा बनावट सातबारा उतारा तयार करून ती जमीन आपली असल्याचे भासवून तिच्या खरेदीच्या मोबदल्यात खान यांच्याकडून ९ जुलै २०१५ रोजी ठाण्याच्या कोर्टनाका येथे पाच लाख रुपये घेतले.
आपले पैसे परत न मिळाल्याने खान यांनी याप्रकरणी ७ फेब्रुवारी २०१९ रोजी ठाणेनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार केल्यानंतर भोईरला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Five lakh cheating, showing the fake identity of seven accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.