चित्रपट निर्माता हैदर काझमीला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 04:16 AM2018-10-13T04:16:37+5:302018-10-13T04:17:20+5:30

तनुश्री दत्ता प्रकरण चर्चेत असतानाच, एका भोजपुरी मॉडेलने एका निर्मात्यावर बलात्काराचा आरोप करीत वर्सोवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पेयातून नशेचे औषध देत चित्रपट निर्माता हैदर काझमी याने बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे.

 Filmmaker Haider Kazimi arrested in case of the rape | चित्रपट निर्माता हैदर काझमीला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक

चित्रपट निर्माता हैदर काझमीला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक

Next

मुंबई : तनुश्री दत्ता प्रकरण चर्चेत असतानाच, एका भोजपुरी मॉडेलने एका निर्मात्यावर बलात्काराचा आरोप करीत वर्सोवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पेयातून नशेचे औषध देत चित्रपट निर्माता हैदर काझमी याने बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी काझमीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
काझमी हा हिंदी चित्रपट ‘जिहाद’चा निर्माता आहे. काझमीने या मॉडेलसोबत चित्रपटाच्या सेटवर मैत्री करीत तिला लग्नाची मागणी घातली. मात्र तिने लग्नाला नकार दिला. तेव्हा त्याने बहीण अनिस काझमी हिची मदत घेत पीडितेला चहा पिण्यासाठी बोलावून घेतले. अनिस तिला काझमीकडे सोडून निघून गेली. याच दरम्यान पीडितेच्या शीतपेयामध्ये त्याने गुंगीचे औषध घालून तिच्यावर बलात्कार केला, असे तिने पोलिसांना केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ९ आॅक्टोबरला हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच दिवशी या गुन्ह्यात काझमीला पोलिसांनी अटक केली. तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर त्याची बहीण अनिस हिचा शोध सुरू आहे.
काझमीवर करण्यात आलेले आरोप खोटे असून निव्वळ पैसे उकळण्यासाठी त्याला फसविले जात असल्याचे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
भोजपुरी चित्रपटात ‘आयटम साँग’ करणाऱ्या मुलीला चित्रपटात काम करण्याची संधी काझमीने दिली आणि तिने त्याच्यावरच गुन्हा दाखल केला, असेही कुटुंबाने सांगितले. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बडगुजर यांनी दिली.

Web Title:  Filmmaker Haider Kazimi arrested in case of the rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक