बनावट ईमेल आयडी बनवून कंपनीला घातला कोटींचा गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 09:17 PM2018-08-22T21:17:36+5:302018-08-22T21:17:58+5:30

आर्थिक व्यवहारात अफरातफर करत १ कोटी ७० लाखांना कंपनीला चुना लावला आहे. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात अजय शाह (वय - ४२) यांनी तक्रार दाखल केली आहे. 

Fake email id to make company crores | बनावट ईमेल आयडी बनवून कंपनीला घातला कोटींचा गंडा 

बनावट ईमेल आयडी बनवून कंपनीला घातला कोटींचा गंडा 

googlenewsNext

मुंबई - कुलाबा येथील विल्को कंपनीत काम करणाऱ्या कर्मचारी असल्याचे भासवून एका ठगाने  बनावट ईमेल आयडी बनवून आर्थिक व्यवहारात अफरातफर करत १ कोटी ७० लाखांना कंपनीला चुना लावला आहे. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात अजय शाह (वय - ४२) यांनी तक्रार दाखल केली आहे. 

नेपियन्सी रोड  येथील सागरकुंज येथे राहणारे अजय शाह यांची कुलाब्यात विल्को नावाची कंपनी आहे. त्या कंपनीत आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या कर्मचाऱ्यासारखा बनावट ईमेल आयडी बनवूनत्यारा करून त्यात थोडा बदल करून तोच कंपनीचा कर्मचारी असल्याचे भासवून इंटरनेटद्वारे शाह यांच्या क्लाईंटला १ कोटी ७० रुपयांची रक्कम परदेशातील इतर बँकांच्या खात्यात हस्तांतर करण्यास सांगितले. त्यामुळे शाह यांची आर्थिक फसवणूक आणू नुकसान केल्याने त्यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात यासंदर्भात भा. दं. वि. कलम ४१९, ४२० आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: Fake email id to make company crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.