ऑक्सिटोसीन इंजेक्शनच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश, १० लाख ६७ हजार रुपयांचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 08:55 PM2021-06-10T20:55:50+5:302021-06-10T20:56:08+5:30

Crime News : सिंधी कॅम्प परिसरात ही कारवाई करीत १०,६७,५०० रुपयांचे इंजेक्शन जप्त करण्यात आले असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून एकास अटक करण्यात आली आहे.

Exposing the mystery of oxytocin injection | ऑक्सिटोसीन इंजेक्शनच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश, १० लाख ६७ हजार रुपयांचा साठा जप्त

ऑक्सिटोसीन इंजेक्शनच्या गोरखधंद्याचा पर्दाफाश, १० लाख ६७ हजार रुपयांचा साठा जप्त

Next

अकोला : खुल्या बाजारातील विक्रीवर बंदी असलेल्या ऑक्सिटोसीन इंजेक्शनची अवैधरीत्या मनमानी भावाने विक्री करण्याच्या गोरखधंद्याचा अकोला पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने गुरुवारी पर्दाफाश केला. सिंधी कॅम्प परिसरात ही कारवाई करीत १०,६७,५०० रुपयांचे इंजेक्शन जप्त करण्यात आले असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून एकास अटक करण्यात आली आहे.

प्रतिबंधित व आरोग्यास अपायकारक असलेल्या ऑक्सिटोसीन इंजेक्शनची खदान परिसरात मोठ्या प्रमाणात जास्त दराने विक्री केली जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली व विलास पाटील यांच्या नेतृत्वातील दहशतवाद विरोधी पथकास मिळाली होती. या माहितीची पडताळणी केल्यानंतर पथकाने गुरुवारी खदान परिसरातील कच्ची खोली येथील जयप्रकाश कलाचंद मोटुवाणी (५०) याच्या घरी छापा टाकला. यावेळी झाडाझडतीमध्ये १० बॉक्समध्ये ऑक्सिटोसीन इंजेक्शनच्या २१३५ बॉटल आढळून आल्या. या इंजेक्शनची किंमत १०,६७,५०० रुपये एवढी आहे. हा सर्व साठा ताब्यात घेऊन जयप्रकाश मोटुवाणी व कमल शर्मा (रा. गया, बिहार) या दोघांविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात कलम १७५, २७४, २७५, ३४, १८ (अ), १८ (क) २२ सीसीए, तसेच औषधी व सौंदर्यप्रसाधने कायदा १९४० च्या कलम २७ (ब), (२), २७ (ड), २८ व १०५ अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी जयप्रकाश मोटुवाणीला अटक करण्यात आली, तर कमल शर्मा फरार झाला आहे.

Web Title: Exposing the mystery of oxytocin injection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.