दिवाळीच्या शॉपिंगला प्रेयसीचा नकार; प्रियकराकडून ब्लेडने वार 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 08:49 PM2018-11-09T20:49:03+5:302018-11-09T20:50:00+5:30

हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी मुलुंड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खाडे यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

Declared shopping of Diwali; Blade warrior | दिवाळीच्या शॉपिंगला प्रेयसीचा नकार; प्रियकराकडून ब्लेडने वार 

दिवाळीच्या शॉपिंगला प्रेयसीचा नकार; प्रियकराकडून ब्लेडने वार 

मुंबई - दिवाळीच्या खरेदीसाठी येण्यास नकार देणाऱ्या विधवा महिलेवर प्रियकराने घरात घुसून ब्लेडने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. भांडुप पश्चिम येथे ही घटना घडली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी मुलुंड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पंकज सातपुतेला अटक करण्यात आली असल्याची माहिती भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खाडे यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

सुश्मिता (वय - २६, बदलेले नाव) ही पतीच्या निधनानंतर ७ वर्षांचा मुलगा आणि वडिलांसोबत भांडुप येथे राहत आहे. विक्रोळी येथे एका खाजगी कंपनीत नोकरी करणारी सुश्मिताचे ३ वर्षांपूर्वी घाटकोपर रमाबाई नगरमध्ये राहणाऱ्या पंकज सातपुते या तरुणासोबत ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले होते. बुधवारी सायंकाळी पंकज हा सुप्रियाच्या घरी आला आणि तिला दिवाळीची खरेदी करण्यासाठी ये असे सांगत तिला सोबत नेण्यासाठी बळजबरी करू लागला. मात्र, तिने त्याच्यासोबत शॉपिंगला जाण्यास नकार दिलाअसता तो रागाने निघून गेला. नंतर काही वेळाने रात्री १० वाजण्याच्या सुमारास पंकज भांडुप येथे सुश्मिताच्या घरी आला आणि त्याने खरेदीसाठी का नाही आलीस? असा जाब विचारत तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ब्लेडने तिच्या गळ्यावर वार केले. या हल्ल्यात ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. हल्लेखोर पंकजने घाबरून तेथून पलायन केले. 

Web Title: Declared shopping of Diwali; Blade warrior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.