दिव्यांग तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार; आरोपींना न्यायालयाने सुनावली शिक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 03:12 PM2019-04-12T15:12:14+5:302019-04-12T15:12:45+5:30

हा सामूहिक लैंगिक अत्याचाराचा प्रकार 9 जानेवारी 2016 रोजी ठाण्यातील लोकमान्य नगर येथे घडला होता. 

Bullying sexual assault on a young woman; Court sentenced to death sentence | दिव्यांग तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार; आरोपींना न्यायालयाने सुनावली शिक्षा 

दिव्यांग तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार; आरोपींना न्यायालयाने सुनावली शिक्षा 

googlenewsNext

ठाणे - २० वर्षीय दिव्यांग तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचारप्रकरणी पाच जणांपैकी चार आरोपींना वीस वर्षाचा कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.तर एका आरोपीला 14 वर्षाचा कारावासाची शिक्षा शुक्रवारी ठाणे न्यायलयाने ठोठावली. हा सामूहिक लैंगिक अत्याचाराचा प्रकार 9 जानेवारी 2016 रोजी ठाण्यातील लोकमान्य नगर येथे घडला होता. 

गोपी बोरा (४३), बालाजी खरात (२८), राजेश मौर्या (२३), कमलनाथ गुप्ता (३४) आणि विजय गुप्ता (२७) अशी आरोपींची नावे आहेत.  ठाण्यात राहणारी पीडित मुलगी   ८ जानेवारी २०१६च्या रात्री  परिसरातच राहणाऱ्या आपल्या बहिणीकडे कामानिमित्त गेली असता, शेजारी राहणाऱ्या गोपी बोरा याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर बालाजी खरात याने तिला रिक्षातून पळवून नेऊन त्याचे साथीदार राजेश, कमलनाथ आणि विजय यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वर्तकनगर पोलिसांनी खरात आणि त्याच्या तीन साथीदारांसह बोरा याला अटक केली. शुक्रवारी याप्रकरणाची सुनावणी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश एस. ए. सिन्हा यांच्या न्यायालयात झाली. त्यांनी सर्व आरोपींना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. सरकारी वकील उज्ज्वला मोहोळकर यांनी काम पाहिले.   

Web Title: Bullying sexual assault on a young woman; Court sentenced to death sentence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.