आत्महत्या केलेल्या तरुणाचा वांद्र्यात मृतदेह सापडला  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 09:34 PM2019-07-12T21:34:11+5:302019-07-12T21:36:55+5:30

मृतदेह ताब्यात घेऊन भाभा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला. 

The body of the victim was found in bandra sea | आत्महत्या केलेल्या तरुणाचा वांद्र्यात मृतदेह सापडला  

आत्महत्या केलेल्या तरुणाचा वांद्र्यात मृतदेह सापडला  

googlenewsNext
ठळक मुद्देतरुणाचा मृतदेह वांद्रे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समुद्र किनारी तरंगत आला.पार्थच्या पालकांना देखील कळविण्यात आले असल्याची माहिती वरपे यांनी दिली. 

मुंबई - वांद्रे - वरळी सीलिंकवरून उडी मारून आत्महत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह वांद्रे येथे सापडला असल्याची माहिती वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखलाल वरपे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. आज दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास या तरुणाने वांद्रे - वरळी सी लिंकवर टॅक्सी थांबवून समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. पार्थ सोमाणी (२३) असं या तरुणाचं नाव आहे. त्यानंतर शोधकार्य सुरु होते. मात्र, तरुणाचा मृतदेह वांद्रे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समुद्र किनारी तरंगत आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पार्थचा मृतदेह ताब्यात घेऊन भाभा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला. 

मुलुंड येथे पार्थ हा राहणार असून सीएकडे नोकरी करत होता. आज दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास वरळीकडून वांद्रे येथे जात असताना ही घटना घडली. त्यानंतर तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मृतदेहाचा शोध घेण्याचे कार्य पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करत होते. वरळी कोळीवाडा, शिवाजी पार्कच्या दिशेने असलेल्या समुद्रावर हेलिकॉप्टर गस्त घातली. मात्र, तोवर मृतदेह सापडला नव्हता.  ज्या टॅक्सीने पार्थ सीलिंकवर आला होता. तो टॅक्सीचालक टॅक्सी घेऊन पळाला आहे. त्याचा शोध सीसीटीव्हीच्या साहाय्याने पोलीस घेतला. त्या टॅक्सीत मुलाचे पाकीट आणि मोबाईल सापडला. त्यावरून मुलाची ओळख पातळी. त्यानंतर सूर्यास्त झाल्याने तरुणाचा शोध घेणं तटरक्षक दलाने थांबवले होते. नंतर रात्री आठ - साडेआठ वाजताच्या सुमारास पार्थचा मृतदेह पोलिसांना सापडला. पार्थच्या पालकांना देखील कळविण्यात आले असल्याची माहिती वरपे यांनी दिली. 


धक्कादायक! वरळी सी लिंकवरून उडी मारून तरुणाने केली आत्महत्या 

Web Title: The body of the victim was found in bandra sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.