ऑनलाईन डेटिंग करताय सावधान; सीएला ३ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 07:40 PM2019-05-31T19:40:29+5:302019-05-31T19:42:46+5:30

या प्रकरणी पवई पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Be careful if you are doing online dating; CA dupped 3 lakhs | ऑनलाईन डेटिंग करताय सावधान; सीएला ३ लाखांचा गंडा

ऑनलाईन डेटिंग करताय सावधान; सीएला ३ लाखांचा गंडा

Next
ठळक मुद्देएका वेबसाइटवरून ५४ वर्षीय तक्रारदार एका बंगाली महिलेच्या संपर्कात होता.तक्रारदाराने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेऊन दुसरं लग्न केलं. दुसऱ्या पत्नीशी देखील त्याचं पटत नसल्यामुळे तिच्यासोबत घटस्फोट घेण्याची प्रक्रीया सुरू आहे.

मुंबई - डेटिंग सारख्या वेबसाईटला भेट देणाऱ्या चार्टड अकाऊन्टंटला (सीए) साडे तीन लाखांना गंडा घातल्याची घटना पवई परिसरात घडली आहे.  एका वेबसाइटवरून ५४ वर्षीय तक्रारदार एका बंगाली महिलेच्या संपर्कात होता. या प्रकरणी पवई पोलीस अधिक तपास करत आहेत. 

पवई परिसरात राहणाऱ्या तक्रारदाराने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेऊन दुसरं लग्न केलं. मात्र, दुसऱ्या पत्नीशी देखील त्याचं पटत नसल्यामुळे तिच्यासोबत घटस्फोट घेण्याची प्रक्रीया सुरू आहे. एप्रिल महिन्यात या तक्रारदाराने एका डेटिंग वेबसाईटवर नमूद मोबाइलवर फोन केला. त्यावेळी समोरील महिलेकडे तक्रारदाराने एका बंगाली महिलेशी डेटिंग करायची असल्यची सांगितलं. त्यानुसार वेबसाईटचं काम पहात असलेल्या महिलेने तक्रारदाराला ४ महिलांचे फोटो पाठवले. त्यातील एका महिलेशी डेटींग करण्याची इच्छा तक्रारदाराने व्यक्त केली. त्यानुसार संकेतस्थळावरील महिलेने सर्वप्रथम तक्रारदाराकडून त्याची सर्व ओळखपत्र जमा करून घेतली. त्यानंतर, वेबसाईटवरील महिलेने तक्रारदाराकडून नोंदणीसाठी ८५० रुपये, संबधित तरुणीशी बोलण्यासाठी १८,७०० रुपये, प्रायव्हसी अॅग्रीमेन्ट ५० हजार, सुरक्षा ठेव ६० असे एका मागोमाग एक ३ लाख उकळले. तरी देखील पैशांची मागणी कमी होत नव्हती. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पवई पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Be careful if you are doing online dating; CA dupped 3 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.