कासरस्त्यावरील रिसाॅर्टमध्ये रात्री नाचवल्या बारबाला; पोलिसांचा अचानक छापा, मालक-वेटर पळाले...

By दत्ता यादव | Published: October 29, 2023 08:35 AM2023-10-29T08:35:53+5:302023-10-29T08:38:10+5:30

पेट्री येथील राज कास हिल रिसाॅर्टमध्ये पुण्याहून बारला आणून रात्री उशिरापर्यंत नाचविल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Barbala danced the night away at the resort on Kaas plateau road Raj Kas Hill Resort; Police surprise raid, 24 people detained | कासरस्त्यावरील रिसाॅर्टमध्ये रात्री नाचवल्या बारबाला; पोलिसांचा अचानक छापा, मालक-वेटर पळाले...

कासरस्त्यावरील रिसाॅर्टमध्ये रात्री नाचवल्या बारबाला; पोलिसांचा अचानक छापा, मालक-वेटर पळाले...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कास, ता. सातारा परिसरातील पेट्री येथे असणाऱ्या राज कास हिल रिसाॅर्टवर छापा टाकून सातारा तालुका पोलिसांनी सहा बारबालांसह २४ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून साऊंड सिस्टीम, डिस्को लाइट, मोबाइल, रोकड असा सुमारे ८२ हजारांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी रिसाॅर्टचे मालक, मॅनेजर, वेटर्ससह २४ जणांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी रात्री एक वाजता करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी, पेट्री येथील राज कास हिल रिसाॅर्टमध्ये पुण्याहून बारला आणून रात्री उशिरापर्यंत नाचविल्या जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी एक पथक तयार केले. पथकाला घेऊन त्यांनी शुक्रवारी रात्री राज रिसाॅर्टवर छापा टाकला. त्यावेळी तेथे संगीताच्या तालावर सहा बारबाला बीभत्स अवस्थेत नाचत होत्या. त्यांच्यासमोर १८ जण बसले होते. यातील काहीजण बारबालांवर पैसे उधळत होते. पोलिसांनी तातडीने रिसाॅर्टचे दरवाजे बंद केले. मात्र, मागच्या दरवाजाने हाॅटेल मालक नंदू नलवडे (रा. नागठाणे, ता. सातारा) तसेच मॅनेजर, वेटर्स तेथून पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी १८ जणांना ताब्यात घेतले. या सर्वांनी संगनमत करून सहा बारबालांना बीभत्स कृत्य करण्यास प्रोत्साहन दिले. तसेच प्रिमायसेस परवान्याचे नूतनीकरण न करता रिसाॅर्टमध्ये विना नोकरनामा सहा महिलांना हाॅटेल मालकाने कामावर ठेवले. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांवर वेगवेगळे गुन्हे दाखल केले. पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, हवालदार मालोजी चव्हाण, सचिन पिसाळ, किरण जगताप, शंकर पाचांगणे, नीलेश यादव आदींनी ही कारवाई केली.

हे बसले होते बारबालांसमोर

धनंजय शहाजी चव्हाण (वय ३१, रा. अंधारवाडी, उंब्रज, ता. कऱ्हाड), राजेंद्र ज्ञानदेव फाळके (वय ४०, रा. पिरवाडी, सातारा), योगेश सुदाम दीक्षित (वय ३४), अशोक जनार्धन जमदाडे (वय १८, रा. दोघेही रा. मसूर, ता. कऱ्हाड), शंभूराज आबासो भोसले (वय ३३, रा. पेरले, ता. कऱ्हाड), अकबर इकबाल शेख (वय ४३, रा. दत्तनगर, कोरेगाव), प्रशांत नंदकुमार फडतरे (वय ३४, रा. करंजे सातारा), शिवाजी नानासो देशमुख (वय ४३, रा. हामदाबाद फाटा, कोंडवे), अमोल रमेश बोतालजी (वय ३३, रा. कोरेगाव), विनायक संजय जगताप (वय २४), इंद्रजित बाळासाहेब पाटील (वय २८, दोघेही रा. मंगळवार पेठ, कऱ्हाड), राजेश दत्तात्रय पवार (वय ४५, रा. धस काॅलनी, सातारा), मिलिंद उत्तम कांबळे (वय ४३, मंगळवार पेठ, सातारा), अमोल प्रकाश शिंगाडे (वय ३४, बुधवार पेठ, कऱ्हाड), जय साहेबराव शेलार (वय ३३, शाहूनगर, सातारा), महेश अरुण गोळे (वय ३०, शाहूनगर, सातारा), प्रकाश हणमंत भोसले (वय ३५, रा. नागठाणे, ता. सातारा), शैलेश बाळासो जाधव (वय २५, रा. मसूर, ता. कऱ्हाड)  

Web Title: Barbala danced the night away at the resort on Kaas plateau road Raj Kas Hill Resort; Police surprise raid, 24 people detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.