अरुण गवळीच्या फरार हस्तक गजाआड 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 08:43 PM2018-07-20T20:43:54+5:302018-07-20T20:45:04+5:30

२३ वर्षापासून फरार असलेल्या गँगस्टर सुरेश उपाध्यायला अटक

Arun Gawli's absconding hand-crafted hawk | अरुण गवळीच्या फरार हस्तक गजाआड 

अरुण गवळीच्या फरार हस्तक गजाआड 

Next

मुंबई - अंडरवर्ल्डचा कुख्यात गुंड अरुण गवळी गँगचा फरार माथेफिरु गँगस्टरच्या गुन्हे शाखेच्या कक्ष- ७ ने  तब्बल २३ वर्षानंतर मुसक्या आवळल्या आहेत. सुरेश उपाध्याय (वय - ४६) असे या गँगस्टरचे नाव असून तो बदलापूरला गेली १५ वर्ष राहत होता अशी माहिती कक्ष ७चे पोलीस निरीक्षक अनिल माने यांनी दिली. 

१९९० च्या दशकात अंडरवर्ल्ड अनेक टोळ्यानी शहरात हैदोस घातला होता. तर दुसरीकडे या टोळकयातच गँगवार सुरु झाला होता. नेमके यादरम्यान, अनेक राजकीय नेते, व्यावसायीक तसेच बॉलिवुड हस्तींना टार्गेट करण्यास अंडरवर्ल्डने सुरुवात केली होती. त्यातच अरुण गवळी गँगच्या हस्तकांनी मोठी दहशत माजवित अनेकांचा खात्मा केला होता. त्यातच गवळी गँगचा हस्तक असलेल्या सुरेश उपाध्याय याने देखील गवळीच्या सांगण्यावरुन अनेक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा खात्मा तसेच खंडणी वसुली सुरु केली होती. संघटित गुन्हेगारी टोळीच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये तसेच खुनाच्या गुन्ह्यात सुरेश उपाध्यायला भांडुप, उल्हासनगर पोलीस ठाण्याने अटक केली होती. महत्वाचे म्हणजे भांडुप पोलीस ठाण्यात १९९२ साली शिवसेना शाखाप्रमुख मारुती हळदणकर यांच्या राहत्या घराजवळ गोळीबार करून हळदणकर यांचा खून केला होता तर ११९३ साली गॅंगवारमधून भांडुप जनता मार्केट येथील गुरजीतसिंग  उर्फ बबली यांच्यावर गोळीबार केला होता. त्यात बबली जखमी झाला होता. १९९५ साली देखील भांडुप टॅंक रोड येथील सुरेश नावाच्या व्यक्तीची हत्या केली होती. उल्हासनगरमध्ये देखी १९९२ साली उपाध्यायने एका व्यापाऱ्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली होती. तीन खुनाचे आणि चार खुनाचा प्रयत्न असे चार गुन्हे उपाध्यायविरोधात आहेत. भांडुपमधील गुन्हांत उपाध्याय दोषी असून न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली होती. मात्र जामीनवर त्याची सुटका झाली. नंतर १९९५ नंतर पुन्हा कधीच तो राहत्या ठिकाणी अथवा इतरत्र आढळून आला नाही. त्यानंतर सत्र न्यायालयाने या आरोपीविरोधात अजामीनपात्र वॉरंट भांडुप पोलिसांना जारी केला. 

१९९५ साली जमिनावर बाहेर येताच फरार झालेला उपाध्याय बदलापूरमध्ये राहत असल्याची माहिती कक्ष - ७ ला मिळाली होती. अखेर त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्याला अटक केली. बदलापूरला तो कुटुंबासह राहत होता. 

Web Title: Arun Gawli's absconding hand-crafted hawk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.