एटीएसने ताब्यात घेतलेल्यांमध्ये इंजिनिअर, सायबर एक्स्पर्ट्सह उच्चशिक्षितांचा समावेश

By पूनम अपराज | Published: January 23, 2019 04:58 PM2019-01-23T16:58:06+5:302019-01-23T17:06:09+5:30

सलमान, मोहसीन आणि ताकी हे तिघे भाऊ असून आयसिसने प्रेरित झालेले आहेत. हे तिघे इतर तरुणांचा देखील आयसिसमध्ये सामील होण्यासाठी ब्रेन वॉश करत होते.

Among the people who took the ATS, engineers, high-scholarships including cyber experts | एटीएसने ताब्यात घेतलेल्यांमध्ये इंजिनिअर, सायबर एक्स्पर्ट्सह उच्चशिक्षितांचा समावेश

एटीएसने ताब्यात घेतलेल्यांमध्ये इंजिनिअर, सायबर एक्स्पर्ट्सह उच्चशिक्षितांचा समावेश

Next
ठळक मुद्देमोहम्मद मझर शेख हा भिवंडीतील एका कंपनीत कॉम्प्युटर इंजिनिअर म्हणून काम करायचा.गेल्या वर्षी मुंब्र्यातील एका मशिदीत रमजानदरम्यान मोहम्मदची मोहसीन आणि सलमानसोबत भेट झाली होती. अल्पवयीन मुलाला मुंब्र्यातून अटक करण्यात आली त्या मुलाने इलेक्ट्रॉनिक्स आणि सायबर सायन्समधून डिप्लोमा पूर्ण केला आहे.

मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कारवाई करत मुंब्र्यातील कौसा, अमृतनगर येथून चार जणांना तर औरंगाबादेतून पाच जणांना ताब्यात घेतले आहे. २६ जानेवारीला साजरा होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ही अतिशय महत्वाची कारवाई असल्याचे म्हटले जात आहे. ताब्यात घेतलेल्या सर्वांचे आयसिसची संबंध असल्याच्या संशयावरून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यापैकी अनेकजण उच्च शिक्षित असून सलमान, मोहसीन आणि ताकी हे तिघे भाऊ मुख्य सूत्रधार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. महत्वाचे म्हणजे मुंबईसह संवेदनशील ठिकाणी पाणी आणि जेवणातून रासायनिक हल्ला करण्याचा कट आखण्यात आला होता. तसेच प्रयागराज येथे होणार कुंभमेळा देखील या संशयितांच्या टार्गेटवर होता. ताब्यात घेतलेल्यांमध्ये अंडरवर्ल्डमधील गँगस्टरच्या मुलाचा देखील सहभाग असल्याचे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले आहे. 

एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान, मोहसीन आणि ताकी हे तिघे भाऊ असून आयसिसने प्रेरित झालेले आहेत. हे तिघे इतर तरुणांचा देखील आयसिसमध्ये सामील होण्यासाठी ब्रेन वॉश करत होते. मोहसीन हे सर्वात मोठा भाऊ असून तो मुंब्र्यातील सर्व सदस्यांवर देखरेख ठेवत असे. मोहम्मद मझर शेख हा भिवंडीतील एका कंपनीत कॉम्प्युटर इंजिनिअर म्हणून काम करायचा. गेल्या वर्षी मुंब्र्यातील एका मशिदीत रमजानदरम्यान मोहम्मदची मोहसीन आणि सलमानसोबत भेट झाली होती. तीन दिवसांपूर्वी मोहसीन औरंगाबादला गेला होता. सोमवारी सायंकाळी मोहम्मदला मुंब्र्यातून पोलिसांनी ताब्यात घेतलं, ज्यावेळी मोहसीनने औरंगाबादला जाण्यासाठी बसमध्ये प्रवेश केला. 

फहाद शाह हा सिव्हिल इंजिनिअर असून तो देखील रमजानदरम्यान मुंब्र्यातील एका मशिदीत सलमानच्या संपर्कात आला. त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते आणि अनेकदा ते दोघे औरंगाबादला गेले होते. फहादकडे सौदी अरेबियाचा व्हिसा देखील आहे. एटीएसच्या सूत्रांचा दावा आहे की, सलमानने फहादचा ब्रेन वॉश केला आहे आणि ज्या अल्पवयीन मुलाला मुंब्र्यातून अटक करण्यात आली त्या मुलाने इलेक्ट्रॉनिक्स आणि सायबर सायन्समधून डिप्लोमा पूर्ण केला आहे. त्याचप्रमाणे झमेन हा मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह असून त्याला रसायनाबाबत अतिशय चांगली माहिती आहे. मोहसिनने त्याला रासायनिक हल्ला घडवून आणण्यासाठी आपल्या गटात सामील करून घेतलं होतं. तर सरफराज हा सलमानला मशिदीतील तरुणांची रेकी करून देण्यासाठी मदत करत असे अशी माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली. 

Web Title: Among the people who took the ATS, engineers, high-scholarships including cyber experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.