गुजरातमध्ये ६६ लाखांचा दरोडा; आरोपीला मुंबईतून केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 06:40 AM2019-05-06T06:40:11+5:302019-05-06T06:40:20+5:30

शस्त्राचा धाक दाखवून गुजरातमध्ये ६६ लाखांचा दरोडा टाकणाऱ्या आरोपीला मुंबईतून गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष ८ ने ताब्यात घेतले आहे.

66 lakhs of robbery in Gujarat; The accused arrested from Mumbai | गुजरातमध्ये ६६ लाखांचा दरोडा; आरोपीला मुंबईतून केली अटक

गुजरातमध्ये ६६ लाखांचा दरोडा; आरोपीला मुंबईतून केली अटक

Next

मुंबई : शस्त्राचा धाक दाखवून गुजरातमध्ये ६६ लाखांचा दरोडा टाकणाऱ्या आरोपीला मुंबईतून गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष ८ ने ताब्यात घेतले आहे. त्याला गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.|

गुजरातच्या मेहसाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवीण सुरेश सावंत (३३) याने एका बसमध्ये शस्त्राचा धाक दाखवत ६६ लाखांचा दरोडा टाकला होता, तसेच एकावर जीवघेणा हल्ला करत तो पसार झाला होता. या प्रकरणी मेहसाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्याचा शोध सुरू होता.

सावंत अंधेरीत लपल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष ८ चे प्रमुख अरुण पोखरकर यांना मिळाली. त्यानुसार, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देवकर, विचारे, हेड कॉन्स्टेबल घरात, पोलीस नाईक माने, तावडे यांनी अंधेरी रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. तो मालाडच्या अप्पापाडा परिसरात राहात होता. त्याला पुढील चौकशीसाठी गुजरात पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Web Title: 66 lakhs of robbery in Gujarat; The accused arrested from Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.